शिक्षकांच्या निवडश्रेणीचे रखडले प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:17 AM2021-03-14T04:17:01+5:302021-03-14T04:17:01+5:30
परभणी : जिल्ह्यातील शिक्षकांच्या वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचे प्रस्ताव रखडले असून, ते निकाली काढावेत, अशी मागणी खासगी प्राथमिक ...
परभणी : जिल्ह्यातील शिक्षकांच्या वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचे प्रस्ताव रखडले असून, ते निकाली काढावेत, अशी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर महासंघाने शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.महासंघाच्यावतीने जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांना देण्यात आले.
शिक्षकांचे वेतन दर महा एक तारखेला अदा करावे, जीपीएफची रक्कम भरणा केलेल्या स्लीप सर्व शाळांना त्वरित द्याव्यात, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत वेतन द्यावे, २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांचे बंद केलेले जीपीएफ खाते सुरू करावे, मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची परिभाषेत अंशदान निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेखाली वर्ग करण्यासाठी नवीन लेखाशिर्ष तयार करावा, खासगी प्राथमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड काळात केेलेल्या कार्याची दखल घेऊन कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र द्यावे तसेच सेवापुस्तिकेत नोंद करावी आदी मागण्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत. संघटनेचे अध्यक्ष बी.एम. सूर्यवंशी, राज्य सहसचिव बालासाहेब वाघमारे, मधुकर पौळ, अरुण पाठक, सारिका सराफ, सुलभा देशमुख, जी.बी. धुळे, धीरज महाजन, कैलास लोणसणे, बी.आर. आव्हाड आदींची उपस्थिती होती.