शोषखड्डे निर्मितीच्या मोहिमेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:33 AM2021-02-21T04:33:27+5:302021-02-21T04:33:27+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी तालुक्यातील आर्वी येथे लोकसहभागातून शोषखड्डेतयार करण्याची मोहीम २० फेब्रुवारी ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी तालुक्यातील आर्वी येथे लोकसहभागातून शोषखड्डेतयार करण्याची मोहीम २० फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आली. टाकसाळे यांनी आर्वी या ग्रामपंचायतीमध्ये दिवसभर थांबून गावाच्या प्रमुख ठिकाणी युवकांच्या मदतीने सांडपाण्यासाठी शोष खड्ड्यांची निर्मिती करुन घेतली. या मोहिमेस गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बीड येथील शांतीवन अनाथालयाचे दीपक नागरगोजे, सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे, बीड येथील इन्फंट इंडिया अनाथालयाचे दत्ता बारगजे आणि बीड येथील बालकल्याण समिती सदस्य तत्वशिल कांबळे यांचे या मोहिमेला सहकार्य लाभले. यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, गट विकास अधिकारी अनुप पाटील, परमेश्वर हलगे, ज्ञानेश्वर गायकवाड, आर्वीच्या सरपंच सविता भिंगारे, उपसरपंच दत्तराव कदम, ग्रामसेवक संजय शिंदे, माऊली कदम आदींची उपस्थिती होती.