परभणीत कुष्ठरोग शोध अभियान सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:34 AM2018-09-25T00:34:26+5:302018-09-25T00:35:38+5:30
महापालिकेच्या वतीने शहरात कुष्ठरोग शोध अभियान सुरू करण्यात आले असून, २४ सप्टेंबर रोजी आरोग्य सभापती सचिन देशमुख यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महापालिकेच्या वतीने शहरात कुष्ठरोग शोध अभियान सुरू करण्यात आले असून, २४ सप्टेंबर रोजी आरोग्य सभापती सचिन देशमुख यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नगरसेविका अनिता रवि सोनकांबळे, फरहत सुलताना शेख मुजावेद, सहायक आयुक्त अब्दुल मुक्तहिद खान, आरोग्य सेवेच्या सहायक संचालक डॉ.विद्या सरपे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती. २४ सप्टेंबरपासून ते ९ आॅक्टोबर या कालावधीत शहरात हे अभियान राबविले जाणार आहे. अभियान कालावधीत आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत. परभणी शहरात १२६ पथके आणि ग्रामीण भागात १०२७ पथकांची या कामी नेमणूक करण्यात आली आहे. ही पथके संशयितांची नोंदणी करुन या रुग्णांना जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविणार आहेत. नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य सभापती सचिन देशमुख यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.जी. पवार यांनी केले.
कार्यक्रमास एम.जी. कांदे, बी.जी. राठोड, पी.एम. बचाटे, आर.एस. नरवाडे, बी.आर. चव्हाण आदींनी प्रयत्न केले.