‘राजगोपालाचारी टाकीवरून पाणीपुरवठा सुरू करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:19 AM2021-08-29T04:19:46+5:302021-08-29T04:19:46+5:30

मागील काही महिन्यांमध्ये नागरिक नवीन नळ कनेक्शन घेऊन मनपाच्या मोहिमेला सहकार्य करीत आहेत. मात्र, अनेक भागांमध्ये अजूनही जुन्या पाईपलाईनवरून ...

‘Start water supply from Rajagopalachari tank’ | ‘राजगोपालाचारी टाकीवरून पाणीपुरवठा सुरू करा’

‘राजगोपालाचारी टाकीवरून पाणीपुरवठा सुरू करा’

Next

मागील काही महिन्यांमध्ये नागरिक नवीन नळ कनेक्शन घेऊन मनपाच्या मोहिमेला सहकार्य करीत आहेत. मात्र, अनेक भागांमध्ये अजूनही जुन्या पाईपलाईनवरून पाणीपुरवठा केला जात आहे. यात काही भागांमध्ये दूषित पाणी येत आहे. याकरिता राजगोपालाचारी उद्यानातील नवीन टाकी व ममता कॉलनी पाण्याची टाकी येथून सर्वच भागांना पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी सचिन देशमुख यांनी महापौर, उपमहापौर तसेच मनपा आयुक्त यांच्याकडे केली आहे. कल्याण नगर, महसूल कॉलनी, शिवराम नगर, संत दासगणू नगर या भागातील नळ कनेक्शनचे टेस्टिंग होऊनसुद्धा पाणी सोडले जात नाही. प्रभागातील एका वाॅर्डात नवीन टाकीवरून पाणी दिले जाते, तर काही भागांना जुन्या टाकीवरून पाणीपुरवठा केला जातो. हा दुजाभाव न करता सर्वांना राजगोपालाचारी उद्यानातील टाकीचे पाणी देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

Web Title: ‘Start water supply from Rajagopalachari tank’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.