शिवजयंतीनिमित्त परभणीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:09 AM2018-02-20T00:09:24+5:302018-02-20T00:10:09+5:30

शेतात काम करणारा कष्टकरी, शेतकरी दररोज मरतोय. कधी गारपीट, कधी दुष्काळ, अतिवृष्टीने पिके हातची जात आहेत. याहीपेक्षा शेतकरी शासनाच्या धोरणांनी जास्त मरतोय. म्हणून शेतकºयांनी शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळेपर्यंत पेटून उठावे, असे आवाहन आ.बच्चू कडू यांनी केले.

State-level agricultural exhibition in Parbhani on the occasion of Shiv Jayanti | शिवजयंतीनिमित्त परभणीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

शिवजयंतीनिमित्त परभणीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): शेतात काम करणारा कष्टकरी, शेतकरी दररोज मरतोय. कधी गारपीट, कधी दुष्काळ, अतिवृष्टीने पिके हातची जात आहेत. याहीपेक्षा शेतकरी शासनाच्या धोरणांनी जास्त मरतोय. म्हणून शेतकºयांनी शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळेपर्यंत पेटून उठावे, असे आवाहन आ.बच्चू कडू यांनी केले.
सेलू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मराठा सेवासंघ, संभाजी ब्रिगेड व छत्रपती संभाजी राजे भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सोमवारी आ.बच्चू कडू बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे होते.
यावेळी स्वागताध्यक्ष आ.विजय भांबळे, जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जि.प.सभापती अशोक काकडे, श्रीनिवास मुंडे, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, जि.प.तील गटनेते राम खराबे, अजय चौधरी, जि.प. सदस्य राजेंद्र लहाने, हेमंतराव आढळकर, रामप्रसाद घोडके, तहसीलदार विद्याचरण कडवकर, एकनाथ पावडे, प्रमोद कुदळे, बाळासाहेब शिंदे, प्रभाकर सुरवसे, नंदकिशोर बाहेती, जयप्रकाश बिहाणी, भास्कर कोलते, डॉ.सुबोध माकोडे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, डॉ.संजय हरबडे आदींची उपस्थिती होती. यावेळी आ.कडू म्हणाले, एकीकडे कर्मचाºयांच्या पगारात वाढ होतेय, मात्र शेतकºयांच्या मालाला भाव मिळत नाही. कापसाला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता. मात्र मिळाला ४ हजार ३०० रुपये. त्यामुळे कर्जमाफीेपेक्षा तुम्हाला लुटलं किती, याचा अभ्यास शेतकºयांनी करावा. कापूस उत्पादक शेतकºयांची ४८ हजार कोटी रुपयांची लूट केली असल्याचा आरोपही आ.कडू यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी एकही मंत्री जीवंत ठेवला नसता. मंत्रालयात आत्महत्या का होतात, त्याचे संशोधन करणे दूरच. मात्र शासनाने जाळी लावणे सुरु केले आहे. चुकीच्या परंपरा, चालीरीतीवर खर्च करण्यापेक्षा वसतिगृह, दवाखाने उभारण्यासाठी खर्च करावा, असे आवाहन आ.कडू यांनी केले. संयोजक छगन शेरे यांनी प्रास्ताविक केले. रामराव बोबडे यांनी सूत्रसंचालन तर रामराव गायकवाड यांनी आभार मानले.

Web Title: State-level agricultural exhibition in Parbhani on the occasion of Shiv Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.