परभणी जिल्हा रुग्णालयातील स्थिती : सिटीस्कॅनची मशीन इन्स्टॉलेशनअभावी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:00 AM2019-05-06T00:00:34+5:302019-05-06T00:00:43+5:30

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नवीन सिटीस्कॅन मशीन दाखल झाली असली तरी या मशीनचे इन्स्टॉलेशन झाले नसल्याने सध्या ही यंत्रणा पडून आहे़

Status of Parbhani District Hospital: A lack of installation of CESCAN machine | परभणी जिल्हा रुग्णालयातील स्थिती : सिटीस्कॅनची मशीन इन्स्टॉलेशनअभावी पडून

परभणी जिल्हा रुग्णालयातील स्थिती : सिटीस्कॅनची मशीन इन्स्टॉलेशनअभावी पडून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नवीन सिटीस्कॅन मशीन दाखल झाली असली तरी या मशीनचे इन्स्टॉलेशन झाले नसल्याने सध्या ही यंत्रणा पडून आहे़
परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय वगळता मराठवाड्यातील सर्वात मोठे रुग्णालय असून, या रुग्णालयात जिल्ह्यातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे़ मात्र मागील काही वर्षांपासून येथील वैद्यकीय सुविधा विस्कळीत झाली आहे़ त्यासाठी तांत्रिक कारणांबरोबरच काही प्रशासकीय कारणांचाही समावेश आहे़ परभणी जिल्ह्यातील शेकडो रुग्ण दररोज जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होतात; परंतु, या रुग्णांना असुविधांचा सामना करावा लागत आहे़
येथील सिटीस्कॅन यंत्रणा पाच वर्षापूर्वी धर्माबाद येथे हलविण्यात आली़ तेव्हापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटीस्कॅनच्या तपासण्यांसाठी रुग्णांची हेळसांड होत आहे़ गंभीर आजाराच्या आणि गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी सिटीस्कॅनद्वारे तपासणी करणे आवश्यक असते़ परंतु, ही यंत्रणाच कार्यान्वित नसल्याने रुग्णांना खाजगी प्रयोगशाळांमधून तपासणी करावी लागत आहे़ विशेष म्हणजे, सिटीस्कॅन तपासणी ही खर्चिक बाब असल्याने गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत होता़
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्रणा कायान्वित करावी, अशी मागणी जोर धरू लागली़ सर्वच स्तरातून मागणीचा रेटा वाढला़ ‘लोकमत’नेही वारंवार पाठपुरावा केल्यानंतर महिनाभरापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी सिटीस्कॅन मशीन प्राप्त झाली़ त्यामुळे रुग्ण व नातेवाइकांची समस्या निकाली निघेल, असे वाटत होते़ मात्र सिटीस्कॅन मशीन येऊन एक महिना उलटला तरी ही यंत्रणा कार्यान्वित झाली नाही़ परिणामी रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय कायम आहे़
कंपनीचे अधिकारी फिरकेनात
च्परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नवीन सिटीस्कॅन मशीन सद्यस्थितीला पॅकबंद अवस्थेत आहे़ ही मशीन जिल्ह्यात दाखल होऊन साधारणत: एक महिन्याचा कालावधी लोटला आहे़
च्सिटीस्कॅन यंत्रणा कार्यान्वित करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची असून, या कंपनीचे अधिकारी अजूनही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आले नाहीत़ तसेच काही प्रमाणपत्र काढणे व इतर प्रक्रिया होणे बाकी असल्याने सिटीस्कॅन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी विलंब लागत आहे़
च्सध्या तरी नवीन सिटीस्कॅन मशीन दाखल होवूनही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची हेळसांड कायम आहे़ जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने पाठपुरावा करून सिटीस्कॅन मशीन कार्यान्वित करावी, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांमधून केली जात आहे़
खाजगी डॉक्टरांशी केला करार
४जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन यंत्रणा बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने शहरातील खाजगी पॅथॉलॉजी लॅबसमवेत करार केला आहे़
४या करारानुसार जिल्हा रुग्णालयात ज्या रुग्णांचे सिटीस्कॅन करणे गरजेचे आहे़ त्यांचे सिटीस्कॅन खाजगी रुग्णालयातून करून घेतले जाते़
४त्याचप्रमाणे महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयात सिटीस्कॅन करून घेतले जाते़ त्यामुळे रुग्णांवर आर्थिक भार पडत नसल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली़

Web Title: Status of Parbhani District Hospital: A lack of installation of CESCAN machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.