परभणी जिल्ह्यातील स्थिती :युवकांनी फिरविली स्वयंरोजगाराकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:36 AM2018-01-12T00:36:51+5:302018-01-12T00:36:59+5:30

शासनाने स्वयंरोजगाराच्या अनेक योजना आखल्या असल्या तरी त्याचा लाभ घेऊन घेणाºयांची संख्या मात्र बोटावर मोजण्या इतकीच आहे़

Status in Parbhani District: Youths move towards self-employment | परभणी जिल्ह्यातील स्थिती :युवकांनी फिरविली स्वयंरोजगाराकडे पाठ

परभणी जिल्ह्यातील स्थिती :युवकांनी फिरविली स्वयंरोजगाराकडे पाठ

googlenewsNext

प्रसाद आर्वीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शासनाने स्वयंरोजगाराच्या अनेक योजना आखल्या असल्या तरी त्याचा लाभ घेऊन घेणाºयांची संख्या मात्र बोटावर मोजण्या इतकीच आहे़
देशभरात अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत़ त्यापैकीच बेरोजगारी ही एक समस्या असून, या समस्येवर उपाय करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जातात़ स्वामी विवेकानंद यांची जयंती युवक दिन म्हणून साजरी केली जाते़ बेरोजगारी हा युवकांशी संदर्भात असलेला विषय असून, या बेरोजगारीवर कशा प्रकारे मात करता येईल, या दृष्टीने आजच्या दिवशी विचारमंथन होण्याची गरज आहे़ युवकांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वत:चा रोजगार स्वत:च शोधून स्वयंरोजगार निर्माण केला तर हा प्रश्न बºयाच अंशी निकाली निघेल़ त्यामुळे परभणी जिल्ह्यातील बेरोजगारांची संख्या शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही संख्या लाखांत असल्याचे दिसून आले़
तर त्या तुलनेत स्वयंरोजगार निर्माण करणाºया युवकांची संख्या मात्र शेकड्यांमध्ये असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे़ त्यामुळे आजचा युवक स्वयंरोजगार निर्मिती करण्यापेक्षा रोजगाराच्या शोधातच भटकत असल्याचे चित्र दिसत आहे़
केंद्र शासनाने स्वयंरोजगारावर भर दिला आहे़ त्यातूनच कौशल्य विकास कार्यक्रम आखला आहे़ या कार्यक्रमांतर्गत विविध छोट्या मोठ्या उद्योगांचे युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक बनविण्याचा हेतू समोर ठेवण्यात आला़ जिल्हा कौशल्यविकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातून मिळालेल्या आकडेवारीनुसार या केंद्रामार्फत युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते़ एकूण ११८ संस्था या केंद्राशी संलग्न आहेत़ ११८ वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण केंद्रामार्फत दिले जाते़ प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गतही प्रशिक्षण देण्यात येते़ यावर्षी या प्रशिक्षणासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे़ परंतु, एकूण बेरोजगारांची संख्या लक्षात घेता ही आकडेवारी कमी आहे़ प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेंतर्गत ३ हजार १७८ युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे़ त्यापैकी १ हजार ८९३ युवकांना कौशल्य विकास प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, त्यापैकी ७७३ युवकांनी स्वत:चा रोजगार उभा केला आहे़
तर महानगरपालिकेच्या अंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान राबविले जाते़ या अभियानामध्ये ५८ कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात आले आहे़ १ हजार ७४० युवकांनी हे उद्योजकता प्रशिक्षण पूर्ण केले आहे़ मात्र त्यापैकी एकाही लाभार्थ्याने स्वयंरोजगारची निर्मिती केली नाही़ त्यामुळे या आकडेवारीवरून स्वयंरोजगार निर्माण करणाºया युवकांची संख्या मात्र कमी असल्याचे दिसत आहे़
जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय युवक दिनी युवकांनी स्वयंरोजगाराची कास धरून स्वत:चा रोजगार शोधला तर देशाच्या विकासाला हातभार लागेल.
५२ हजार बेरोजगारांची शासनाकडे नोंदणी
शैक्षणिक सत्र पूर्ण झाल्यानंतर शासकीय नोकºया किंवा शासनाच्या योजनांमधून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी युवकांची नोंदणी केली जाते़ ही नोंदणी आॅनलाईन पद्धतीने करावी लागते़ डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत जिल्ह्यात ५२ हजार २५ बेरोजगारांनी नोंदणी केली आहे़ त्यामध्ये ३८ हजार ३२४ पुरुष आणि १३ हजार ७०१ महिलांचा समावेश आहे़ बदलत्या काळात अनेक जण ही नोंदणी करीत नाहीत़ त्यामुळे बेरोजगार युवकांचा आकडा यापेक्षा किती तरी अधिक आहे़

Web Title: Status in Parbhani District: Youths move towards self-employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.