परभणी जिल्ह्यातील सेलू येथील स्थिती :प्रभारी अधिकाऱ्यांवर कार्यालयांचा पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:15 AM2018-06-10T00:15:37+5:302018-06-10T00:15:37+5:30
सेलू येथील प्रमुख शासकीय कार्यालयांचा रिक्त पदाचा पदभार प्रभारींवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेताना अडचणी निर्माण होत असून याचा परिणाम कामकाजावर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : येथील प्रमुख शासकीय कार्यालयांचा रिक्त पदाचा पदभार प्रभारींवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेताना अडचणी निर्माण होत असून याचा परिणाम कामकाजावर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना गावापर्यंत पोहोचविण्यासाठी पंचायत समिती कार्यालयावर मोठी जबाबदारी आहे. परंतु, येथील गटविकास अधिकारी चंद्रमुनी मोडक यांची २६ जुलै २०१७ रोजी बदली झाली. त्यानंतर डी.एस. आहिरे यांच्याकडे गटविकास अधिकारीपदाचा प्रभारी पदभार सोपविण्यात आला. मे महिन्यात पी.बी. काकडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काकडे अद्यापही रुजू झाले नाहीत. त्यामुळे अनेक विकासकामे खोळंबली आहेत.
कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार अडीच वर्षापासून प्रभारी अधिकाºयांकडे सोपविण्यात आला आहे. अडीच वर्षापूर्वी तालुका कृषी अधिकारी राम रोडगे यांची जालना येथे बदली झाल्यानंतर परभणीचे मिलींद बीडबाग यांच्याकडे दोन वर्ष पदभार होता.
जानेवारी महिन्यांपासून मंडळ कृषी अधिकारी आर.जी. मगर यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे सहकार विभागातील सहाय्यक निबंधक दिलीप गौंडर यांची मे महिन्यात बदली झाली आहे. त्यांचा पदभार इतर अधिकाºयांकडे सोपविला आहे.
उपजिल्हा रुग्णालयालाही रिक्त पदांची समस्या सतावत आहे. येथील वैैैद्यकीय अधीक्षकपद एक वर्षांपासून रिक्त असून, वैद्यकीय अधिकारी संजय हरबडे यांच्याकडे या पदाचा पदभार आहे. हरबडे यांनी या पदाला न्याय दिला असला तरी इतर वैद्यकीय अधिकाºयांची रिक्त पदे रिक्त असल्याने येथील रुग्णसेवेवर परिणाम होते.
एकंदर तालुक्यातील महत्त्वाच्या कार्यालयात प्रभारीराज असल्याने विकासाच्या कामांवर परिणाम होत आहे. प्रभारी अधिकारी निर्णय घेण्यास विलंब करतात. त्यामुळे नागरिकांना एकाच कामांसाठी खेटा माराव्या लागतात.
अधिकाºयांची नकारघंटा
शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक शहर म्हणून ओळख असलेल्या सेलू शहरामध्ये येण्यासाठी पूर्वी अधिकारी उत्सुक असत. परंतु, काही वर्षांपासून लोकप्रतिनिधी व पदाधिकाºयांचा आक्रमक पवित्रा आणि कोणत्याही मुद्यावर टोकाचा संघर्ष होत आहे. त्यामुळे यामध्ये आपण भरडले जातोत की काय, या शक्यतेने नवीन अधिकारी सेलू येथे येण्यास उत्सुकता दाखवित नाहीत. परिणामी येथील महत्त्वाची पदे वर्षानुवर्षे रिक्त राहत आहेत.