पाडव्यानिमित्त बाजारपेठेत दुकान लावण्याच्या कारणावरून सावत्र भावाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 11:25 AM2019-04-04T11:25:57+5:302019-04-04T11:27:47+5:30
डोक्यात लोखंडी रॉड आणि अंगावर चाकूचे वार करून हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
परभणी - शहरातील गुजरी बाजारात पाडव्यानिमित्त विकल्या जाणाऱ्या गाठीचे दुकान दुकान लावण्याच्या वादातून सावत्र भावाची हत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. सोमनाथ लक्ष्मण आळणे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. सोमनाथ यांच्या डोक्यात लोखंडी रॉड आणि अंगावर चाकूचे वार करून हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
शहरातील बाजारपेठेचा भाग असलेल्या गुजरी बाजारात पाडव्यानिमित्त साखरेच्या गाठ्या विक्री करण्यासाठी तात्पुरती दुकाने लावली जातात. गुरुवारी सकाळी हे दुकान लावत असताना सोमनाथ लक्ष्मण आळणे आणि त्याच्या इतर दोन भावात वाद झाला. त्याचे पर्यावसन मारहाणीत झाले. लोखंडी रॉड, चाकूने सोमनाथ याच्यावर दोन भावांनी हल्ला केला. या मारहाणीत जखमी झालेल्या सोमनाथ यास जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच जिल्हा रुग्णालय परिसरात आणि घटनास्थळी बघ्यांची देखील गर्दी जमली होती. काही काळ तणाव निर्माण झाल्याने बाजारपेठ बंद झाली. दरम्यान दोन्ही आरोपी घटनेनंतर घटना घडल्यानंतर फरार झाले आहेत.