१८ हजार डोसेसचा साठा जिल्ह्यात उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:17 AM2021-04-09T04:17:54+5:302021-04-09T04:17:54+5:30
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जात आहे. सिरम इन्स्टिट्यूटची कोविसिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन अशा दोन ...
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जात आहे. सिरम इन्स्टिट्यूटची कोविसिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन अशा दोन लसी जिल्ह्याला प्राप्त झाल्या आहेत. आतापर्यंत १ लाख ४ हजार ८५० डोस जिल्ह्याला मिळाले असून त्यापैकी ८३ हजार ४८४ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. सद्य:स्थितीला १३ हजार ५५० डोस शीतकरण साखळीमध्ये असून शीतगृहात ५ हजार २४० डोस उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील एकूण उपलब्ध डोसची संख्या १८ हजार ९९० एवढी आहे. त्यामुळे आणखी ५ ते ६ दिवस जिल्हावासीयांना लसीची कमतरता पडणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
डोस वाया जाण्याचे प्रमाण तीन टक्के
एक वायल लसीकरणासाठी बाहेर काढल्यानंतर त्यातून १० जणांना वापर करता येतो. यात काही डोस वाया जाण्याची शक्यता असते. आरोग्य विभागाने १० टक्के डोस वाया जातील, असे गृहीत धरले आहे; परंतु आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३ टक्के डोस वाया गेले आहेत. जिल्ह्यात ८३ हजार ४८४ नागरिकांना लसीकरण झाले असून, त्यासाठी ८५ हजार ८६० डोसचा वापर झाला आहे.