पंधरा दिवसात दोनदा कापुस खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:13 AM2021-01-09T04:13:47+5:302021-01-09T04:13:47+5:30
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावातही पणन महासंघाने कुठलाही विचार न करता शेतकऱ्यांचा कापूस आमच्या जिनिंग प्रेसिंगमध्ये दिला. मात्र, त्याच कालावधीत ...
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावातही पणन महासंघाने कुठलाही विचार न करता शेतकऱ्यांचा कापूस आमच्या जिनिंग प्रेसिंगमध्ये दिला. मात्र, त्याच कालावधीत अतिवृष्टी झाली. या नैसर्गीक आपत्तीत मोठे नुकसान झाले. परिणामी, कापसाची प्रत घसरली, त्यात घट झाली. कापूस देण्याबाबतचे नियोजन कापूस पणन महासंघाचे होते, आमच्याकडे कुठलीही विचारणा न करता पणन महासंघाने तो कापूस आमच्या माथी मारला, असे असतानाही पणऩ महासंघ त्या कापसाच्या नुकसानीची भरपाई जिनिंग प्रेसिंग संचालकांवर टाकली. त्यामुळे महासंघाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कापसाची प्रत व घट झाली असून त्याची नुकसान भरपाई जिनिंग प्रेसिंग संचालकांकडून घेतली जात आहे. ती पूर्णतः चुकीची आहे. प्रलंबित बिले तातडीने अदा करावित, यासह अन्य मागण्यांसाठी कापूस खरेदी व उतराई ११ व १२ जानेवारी रोजी बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच जिनिंग आणि प्रेसिंग असोसिएशन या आंदोलन व मकर संक्रात सणामुळे सीसीआयच्या मुख्य कार्यालया कडून ६ जानेवारी रोजी सीसीआयच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रप्रमुख यांना लेखी पत्र काढून ११ ते १४ जानेवारी दरम्यान कापूस खरेदी करू नये असे आदेश दिले आहेत. यामुळे बाजार समितीच्या यार्डात होणारी सीसीआयची खरेदी या काळात चार दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे तालुक्यातील तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी आणू नये, असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या जिनिंग, प्रेसिंगचा समावेश
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील राघवेंन्द्र जिनिंग प्रेसिंग, पोरवाल जिनिंग, राहुल जिनिंग, संगमेश्वर जिनिंग, स्वामी समर्थ जिनिंग, संत भगतराम जिनिंग, व्यंकटेश जिनिंग, केशव जिनिंग,भगवती जिनींग, राधेशाम जिनिंग या जिनिंग प्रेसिंग आंदोलनात सहभागी होणार आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक फटका
सीसीआयने करार केलेल्या जिनिंगमध्ये साठवणुकीसाठी जागा शिल्लक नसल्याने २५ ते ३० डिसेंबर रोजी कापुस खरेदी बंद होती. यांनतर ३१ डिसेंबर ला खरेदी सुरु करण्यात आली. यानंतर असोसिएशनच्या आंदोलनामुळे आणि मकर संक्रात मुळे ११ ते १४ जानेवारी दरम्यान खरेदी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कापुस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.