परभणी-गंगाखेड महामार्गावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:37 AM2019-05-11T00:37:41+5:302019-05-11T00:38:16+5:30
तालुक्यातील मुळी येथील गोदावरी नदीपात्रातील मुळी बंधाऱ्याला उभ्या उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत, या प्रमुख मागणीसाठी १० मे रोजी सकाळी ११ वाजता खळी येथील गोदावरी पुलाजवळ दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ या रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : तालुक्यातील मुळी येथील गोदावरी नदीपात्रातील मुळी बंधाऱ्याला उभ्या उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत, या प्रमुख मागणीसाठी १० मे रोजी सकाळी ११ वाजता खळी येथील गोदावरी पुलाजवळ दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ या रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़
अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने गंगाखेड तालुक्यात भिषण पाणीटंचाईबरोबरच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ या भागातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडून हतबल झाला आहे़ शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरणाºया मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने गोदावरी नदी काठच्या गावांमध्ये कधी नव्हे अशी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़
त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मुळी बंधाºयाला उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत, तालुक्यात दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्यात, रोजगार हमीची कामे सुरू करावीत आदी मागण्यांसाठी तालुक्यातील खळी पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़
या आंदोलनात कॉ़ राजन क्षीरसागर, माजी खा़ सुरेश जाधव, लक्ष्मणराव गोळेगावकर, माणिक पवार, गोपीनाथ भोसले, संजय कच्छवे, माणिक कदम, सुरेश इखे, शिवाजी कदम, सूर्यमाला मोतीपवळे, गोविंदराव मानवतकर, विजय सोन्नर, चंद्रकांत जाधव, लहू सलगर, गंगाधर जाधव, राजाभाऊ कदम, साहेबराव भोसले, दादासाहेब पवार, अशोक भोसले, रामेश्वर पवार, गजानन लांडे, दत्ता पवार, बळीराम सोन्नर आदींसह नागरिक सहभागी झाले होते़ नायब तहसीलदार ज्ञानेश्वर घोंगडे, मंडळ अधिकारी शंकर राठोड यांनी आंदोलनकर्त्यांचे विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले़
यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता़ यावेळी पोलीस निरीक्षक गजानन सैदाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश खंदारे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी लासेवार, अण्णा मानेबोईनवार, कल्याण साठे, उमाकांत जाधव, सुग्रीव कांदे यांची उपस्थिती होती़
दरवाजे बसविण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर
च्गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाºयाला प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आलेले स्वयंचलित दरवाजे निखळून पडले आहेत़
च्या जागी नव्याने उभ्या उचल पद्धतीचे दरवाजे बसविण्याचा प्रस्ताव ६ मे रोजी शासनाकडे सादर केला आहे़
च्याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विलास कापसे यांनी आंदोलनकर्त्यांशी बोलताना दिली़
अडीच तास वाहतूक ठप्प
च्मुळी बंधाºयाला उचल पद्धतीचे दरवाजे बसविण्यात यावेत, या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी गंगाखेड- परभणी रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले़ त्यामुळे या महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ परिणामी अडीच तास वाहतूक ठप्प झाली होती़