ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर परभणीत रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:13+5:302021-06-22T04:13:13+5:30

ओबीसींच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील विविध ओबीसी संघटना तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू ...

Stop the road in Parbhani on the question of OBC reservation | ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर परभणीत रास्ता रोको

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर परभणीत रास्ता रोको

Next

ओबीसींच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील विविध ओबीसी संघटना तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत सोमवारी परभणीत वसमत रोडवरील खानापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. एक ते दीड तास केलेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या आंदोलनात अ. भा. समता परिषदेचे चक्रधर उगले, नानासाहेब राऊत, एन. आय. काळे, अनिल गोरे, डॉ. सुनील जाधव, राष्ट्रवादीचे प्रा. किरण सोनटक्के, नंदा राठोड, गोविंद यादव, अर्जुन वजीर, सुधाकरराव राठोड, कृष्णा कटारे, डॉ. विठ्ठल घुले यांच्यासह ओबीसीच्या विविध संघटनांचे कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.

या मागण्यांसाठी आंदोलन

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण कायम ठेवावे, सन २०१९ ची सार्वजनिक जनगणना केंद्र सरकार जातीनिहाय करणार नसेल तर महाराष्ट्र शासनातर्फे राज्यात जातीनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाचे ओबीसीकरण करू नये, ओबीसीच्या महाज्योती या संशोधन प्रशिक्षण संस्थेसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, आदींसह १९ मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.

Web Title: Stop the road in Parbhani on the question of OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.