जिभेचे चोचले थांबवा, तिखट, मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:19 AM2021-09-03T04:19:18+5:302021-09-03T04:19:18+5:30
कोरोना कालावधीत बंद असलेले हाॅटेल्स मागील महिन्यापासून सुरू झाले आहेत. यातच पावसाळ्यात हॉटेल्स व बाहेरील हातगाड्यांवर मिळणारे चमचमीत व ...
कोरोना कालावधीत बंद असलेले हाॅटेल्स मागील महिन्यापासून सुरू झाले आहेत. यातच पावसाळ्यात हॉटेल्स व बाहेरील हातगाड्यांवर मिळणारे चमचमीत व मसालेदार खाद्यपदार्थ सेवनाचा मोह अनेकांना आवरत नाही. यातच अनेजण बाहेरील खाद्यपदार्थांचे सेवन नेहमीच करतात. यातून तब्येत खराब होऊ शकते, तसेच पोटाचे विकारही जडू शकतात. याकडे दुर्लक्ष केल्यास मूळव्याधीचा त्रासही होऊ शकतो. यामुळे बाहेरील खाद्य पदार्थ व तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
काय आहेत लक्षणे
पोट दुखणे
उलट्या होणे
भूक मंदावणे
वजन अचानक घटणे
शरीरात चरबीचे प्रमाण वाढणे
त्वचा रोग होणे
चेहऱ्यावर फोड येणे
केस गळणे
काय काळजी घ्यावी
पावसाळ्यात असो का अन्य वातावरणात दररोजचे २ वेळचे जेवण वेळेवर करावे. यामध्ये कमी प्रमाणात तिखट पदार्थांचे सेवन करावे, तळलेले पदार्थ शक्यतो खाऊ नयेत, जेवनानंतर फळांचे सेवन करावे, तसेच हिरव्या पालेभाज्या, ताक, दूध, दही यांचे प्रमाण जेवनात वाढवावे.
असा आहे अल्सरचा धोका
तिखट पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते. यामुळे पित्ताचा प्रकोप होतो. यातून पोट खराब होते. यानंतर अल्सरचे प्रमाण आमाशयात वाढते व पचनक्रियेचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. यातून वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढू शकतो.
पौष्टिक आहार हाच महत्त्वाचा
दररोजच्या जेवणामध्ये सकस आहार, कमी तिखट पदार्थ व ताजे जेवण करणे गरजेचे आहे. यामुळे पचनक्रिया चांगली होते. पचनक्रिया चांगली राहिल्यास झोप चांगली येते. यामुळे पोट निरोगी राहते. दररोजच्या जेवणात वरण, भात, भाजी, भाकरी, काकडी, मुळा, गाजर यासारख्या पदार्थांचे सेवन करावे. सकस आहारामुळे कफ, वात, पित्त हे तिन्ही दोष होत नाहीत, तसेच सकस आहारामुळे चरबीचे प्रमाणही वाढत नाही. - डॉक्टर प्रशांत धमगुंडे.