महावितरणविरुद्ध पुन्हा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:20 AM2017-08-02T00:20:11+5:302017-08-02T00:20:11+5:30
तालुक्यातील साळणा ३३ के व्ही उपकेंद्रांतर्गत पाच गावांचा विद्युत पुरवठा खंडित केल्यावरून रास्तारोको करणाºया ३३ आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याविषयावरून आंदोलन करणाºया कार्यकर्त्यांची ही दुसरी वेळ आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील साळणा ३३ के व्ही उपकेंद्रांतर्गत पाच गावांचा विद्युत पुरवठा खंडित केल्यावरून रास्तारोको करणाºया ३३ आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याविषयावरून आंदोलन करणाºया कार्यकर्त्यांची ही दुसरी वेळ आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील बेरूळा, अनखळी, पेरजाबाद, पोटा बु., नांदखेडा या गावामधून महावितरण कंपनीला एकही रुपयाही बिलापोटी वसूल होत नसल्याने त्यांनी या गावाचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. याविरोधात शिवसेनेचे ज्ञानेश्वर झटे, राजाभाऊ मुसळे, रामप्रसाद कदम, नंदकिशोर रवंदळे, सखाराम गारकर, बन्सी जाधव, लक्ष्मण कदम, नीळकंठ जाधव, सागर जाधव, बाळू मुंजाळ, माऊली माने, कुंडलिक वाघ, एकनाथ मगर, शिवाजी कदम, कुंडलिक आव्हाड, ज्ञानेश्वर जाधव, बाळासोब जाधव, मारोती आव्हाड, शिवाजी कदम, शेकूजी गारकर, ज्ञानेश्वर गारकर, नागनाथ गारकर, लक्ष्मण गारकर, बबन चव्हाण, नानासाहेब गारकर, संतोष कदम, अंगद कदम, मुंजाजी कदम अशा ३३ रास्ता रोको आंदोलनकर्त्यांवर पोलीस हेड कॉन्स्टेबल फकरोद्दीन सिद्दीकी यांनी फिर्याद दिल्यावरून ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कार्यकर्त्यांनी पाच गावांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने हे आंदोलन करण्यात आले असून, या अगोदर असेच आंदोलन करण्यात आले होते.
याबाबत महावितरण कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांनी सांगितले की, या पाच गावामधून केवळ ३ ते ५ जणांनीच विद्युत कनेक्शन घेतलेले आहे.
त्यामुळे ९८ टक्के लोकांकडे अवैध वीज कनेक्शन असल्यामुळे वीजपुरवठा खंडित केल्याचे जैन यांनी सांगितले आहे.