परभणी मनपाच्या कारभारावर जोरदार टीका: खड्ड्यात बसून आमदारांनी केला यज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:10 AM2018-08-29T00:10:00+5:302018-08-29T00:10:47+5:30

शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊनही महापालिका रस्त्याची कामे करीत नसल्याने आ. डॉ.राहुल पाटील यांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून मनपाच्या नाकर्तेपणाच्या विरोधात यज्ञ केला. या आंदोलनामुळे शहरातील रस्त्यांचा प्रश्न चर्चेला आला आहे.

Strong criticism on the administration of Parbhani Municipal Corporation: MLA sitting in the pit and offering sacrifices | परभणी मनपाच्या कारभारावर जोरदार टीका: खड्ड्यात बसून आमदारांनी केला यज्ञ

परभणी मनपाच्या कारभारावर जोरदार टीका: खड्ड्यात बसून आमदारांनी केला यज्ञ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊनही महापालिका रस्त्याची कामे करीत नसल्याने आ. डॉ.राहुल पाटील यांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून मनपाच्या नाकर्तेपणाच्या विरोधात यज्ञ केला. या आंदोलनामुळे शहरातील रस्त्यांचा प्रश्न चर्चेला आला आहे.
परभणी शहरातील एकाही रस्त्यावरुन वाहनधारकांना आपली वाहने सुरळीत नेता येत नाहीत. त्यामुळे सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास वसमत रस्त्यावरुन रॅलीद्वारे शिवसैनिक शहरातील रस्त्यांवरुन फिरले. देशमुख हॉटेल येथील खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून मनपाचा निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर आ.डॉ.राहुल पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी निरज हॉटेल ते अण्णा भाऊ साठे चौक या रस्त्यावरील विनायक हॉटेलसमोरील खड्ड्यामध्ये बसून महापालिकेच्या नाकर्तेपणाच्या विरोधात यज्ञ केला. यावेळी मनपाच्या विरोधात दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला. ढोल -ताशाच्या गजरात अर्धा तास आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आ.डॉ.राहुल पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी थेट महापालिका कार्यालय गाठून आयुक्तांना शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांबरोबरच विकासकामांसंदर्भात जाब विचारला. महापालिकेला विकासकामासाठी निधी देऊनही कामे का होत नाहीत, असा सवाल आ.डॉ.राहुल पाटील यांनी केला. नाट्यगृहासाठी १० कोटींचा, शिवाजी पार्कसाठी साडेचार कोटींचा, ग्रंथालय आदींसाठी निधी दिला आहे; परंतु, कामे होत नाहीत, असा आरोप करीत महापालिकेने येत्या १५ दिवसांत शहरातील खड्डे बुजवावेत, नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे, शहरातील वसाहतींमध्ये पथदिवे बसवावेत आणि कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा आ.डॉ. पाटील यांनी दिला. यावेळी शहरातील पार्किंग झोन तयार करणे, अस्ताव्यस्त लावलेली गाडे हटविण्याची कामेही तात्काळ करावेत. तसेच घंटागाडी भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती नियुक्ती करावी, अशी मागणी केली. यावेळी आयुक्त रमेश पवार यांनी येत्या १५ दिवसांत खड्डे बुजविण्याची कामे केली जातील, पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती दिली असून डिसेंबरपूर्वी हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. आ.डॉ. पाटील यांच्यासह शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, माजी विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे, अनिल डहाळे, मनपातील गटनेते चंदू शिंदे, नगरसेवक सुशील कांबळे, प्रशास ठाकूर, ज्ञानेश्वर पवार, संभानाथ काळे, मारोती तिथे, राहुल खटींग, उद्धव मोहिते, राहुल कांबळे, नवनीत पाचपोर, बाळराजे तळेकर, नितीन सोमाणी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
अधिकारी-पदाधिकारी स्वार्थ साधण्यात मश्गुल - पाटील
महानगरपालिकेत सध्या अधिकारी व पदाधिकाºयांना शहरवासियांचे रस्ता, पाणी आदी मुलभूत प्रश्न सोडविण्यात रस नसून त्यांना फक्त कोणत्या कामाचे कंत्राट कोणाला मिळेल व त्यातून आपणाला काय मिळेल, याचाच विचार केला जात आहे. या माध्यमातून मनपात सध्या फक्त लूट सुरु आहे, असा आरोप आ.डॉ. राहुल पाटील यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. शहरात सध्या विविध भागांमध्ये डेंग्यूची साथ सुरु आहे. त्यामुळे विविध ठिकाणी धूर फवारणी करा, अशी मागणी आयुक्तांकडे केली असता आयुक्त पावसाळ्यात धूर फवारणी करीत नाहीत, असे अजब सांगत आहेत. त्यांनाच धूर फवारणीचे महत्त्व नाही. मनपातील अधिकारी व पदाधिकाºयांची शहराचा विकास करण्याची बिलकूल मानसिकता नाही. त्यांना त्यांचे फक्त स्वार्थ साध्य करायचे आहे. बाहेरील कंत्राटदाराला येथे येऊ दिले जात नाही. कोणी कंत्राटदार आला तर त्याला पळवून लावले जाते. मनपात सध्या फक्त जनतेच्या पैशांची लूट सुरु आहे, असाही आरोप आ.पाटील यांनी केला.

Web Title: Strong criticism on the administration of Parbhani Municipal Corporation: MLA sitting in the pit and offering sacrifices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.