चारठाणा येथे भाजपप्रणित ग्रामविकास पॅनलची दमदार कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:18 AM2021-01-20T04:18:54+5:302021-01-20T04:18:54+5:30
आमदार मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपप्रणित ग्रामविकास पॅनलने प्रभाग क्रमांक ४, ५, व ६ मध्ये एकूण नऊ जागा ...
आमदार मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपप्रणित ग्रामविकास पॅनलने प्रभाग क्रमांक ४, ५, व ६ मध्ये एकूण नऊ जागा लढविल्या. त्यात सात जागा जिंकल्या आहेत. भाजपने कमी जागा लढवून अधिक यश मिळविले आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्या मीना राऊत यांच्या समता पॅनलने १७ उमेदवार उभे केले होते. त्यात त्यांना सातच जागा मिळाल्या. भाजपचे इंद्रजित घाटूळ यांनी प्रभाग क्र. ४ मध्ये दिलेले उमेदवार गणेश उत्तम पारवे, सय्यद नगमा सय्यद खलील, सोनाली इंद्रजित घाटूळ, प्रभाग ५ मधून इंद्रजित दत्तराव घाटूळ हे विजयी झाले. प्रभाग ६ मध्ये भाजपचे अनिरुद्ध विश्वंभर चव्हाण, अरुणा दौलतराव देशमुख, तरन्नुम मतीन तांबोळी हे उमेदवार विजयी झाले. प्रभाग ४ मधील लक्षवेधी लढतीत सोनाली इंद्रजित घाटूळ यांनी सीमा अण्णासाहेब राऊत यांचा, तर प्रभाग क्र. ५ मध्ये इंद्रजित घाटूळ यांनी गणेश राऊत यांचा पराभव केला. एकंदरीत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपप्रणित ग्रामविकास पॅनलने ७, जिल्हा परिषदेच्या सदस्या मीना राऊत यांच्या समता पॅनलने ७, तर महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने १, काँग्रेसने २ जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या निवडीत त्यांचीही भूमिका महत्त्वाची राहणार आहे.