परभणीत दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:20 AM2019-09-19T00:20:50+5:302019-09-19T00:21:14+5:30

दोन आठवड्यांपासून विश्रांती घेतलेला पाऊस जिल्ह्यात दाखल झाला असून, मंगळवारी रात्री जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याची भूजल पातळी वाढण्यासाठी हा पाऊस पोषक ठरेल, असे मानले जात आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ११.९८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Strong rain in Parbhani | परभणीत दमदार पाऊस

परभणीत दमदार पाऊस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दोन आठवड्यांपासून विश्रांती घेतलेला पाऊस जिल्ह्यात दाखल झाला असून, मंगळवारी रात्री जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याची भूजल पातळी वाढण्यासाठी हा पाऊस पोषक ठरेल, असे मानले जात आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ११.९८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीच्या काळात पावसाने ताण दिल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र मध्यंतरी झालेल्या पावसाने पिकांना दिलासा मिळाला. त्यानंतर दोन आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली होती. जिल्हावासियांना परतीच्या पावसाचे वेध लागले असतानाच मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यात पाऊस पुन्हा दाखल झाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्रीच्या वेळी सोनपेठ तालुका वगळता जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्हावासिय सुखावले आहेत.
जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या नोंदीनुसार पालम तालुक्यात सर्वाधिक ३३.३३ मि.मी., पूर्णा तालुक्यात १३ मि.मी., सेलू तालुक्यात १८.४० मि.मी., मानवत तालुक्यात १२.३३ मि.मी., पाथरी तालुक्यात ९.६७ मि.मी., परभणी- ८.४८ मि.मी., जिंतूर- ६.८३ आणि गंगाखेड तालुक्यात ५.७५ मि.मी. पाऊस झाला आहे.

Web Title: Strong rain in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.