परभणी जिल्ह्यात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:26 AM2019-10-07T00:26:29+5:302019-10-07T00:26:42+5:30
रविवारी दुपारच्या सुमारास परभणीसह मानवत, पाथरी, सेलू आणि जिंतूर तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. एक ते दीड तासाच्या या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकासह कापसाचे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : रविवारी दुपारच्या सुमारास परभणीसह मानवत, पाथरी, सेलू आणि जिंतूर तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. एक ते दीड तासाच्या या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकासह कापसाचे नुकसान झाले आहे.
परभणी शहरासह तालुक्यात दुपारी एक वाजेच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरु झाला. काही वेळातच जोरदार पावसालाही सुरुवात झाली. एक वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत शहर परिसरात हा पाऊस बरसला. पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून चिखलातून मार्ग काढताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. परभणी शहरासह टाकळी कुंभकर्ण, पिंगळी, वांगी, असोला या भागातही पावसाने हजेरी लावली.
जिंतूर तालुक्यातील बामणी व परिसरात रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. तसेच येलदरी परिसरातही पावसाने हजेरी लावली. एक ते दीड तास झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मानवत तालुक्यात दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.
यावर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने मोठा ताण दिला होता. आता खरीपातील पिके काढणीला आले आहेत आणि त्यातच पाऊस होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे.
अनेक भागात सोयाबीन कापून ठेवले आहे. तर काही भागात सोयबीनची काढणी सुरु आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथील शेतकरी गंगाधर चव्हाण यांनी सोयाबीनची हार्वेस्टर यंत्राद्वारे काढणी केली होती. रविवारी झालेल्या पावसाने हे सोयाबीन भिजले आहे. अशीच परिस्थिती या भागातील इतर शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.
सेलूत जोरदार पाऊस
४ सेलू व परिसरात रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. सलग दुसºया दिवशी दमदार पाऊस झाल्याने परिसरातील पिकांचे नुकसान होत आहे. दरम्यान रविवारी वादळी वाºयासह पाऊस झाल्याने तालुक्यातील केमापूर परिसरातील कापसाची झाडे वाकून गेली आहेत.
येलदरी प्रकल्प : ९.१७ टक्के पाणी
४जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पाच्या वरील बाजुस असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे ५ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास या प्रकल्पाचे ५ दरवाजे १० सें.मी.ने वर उचलण्यात आले असून खडकपूर्णा प्रकल्पातून २ हजार ४४० क्युसेस पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात केला जात आहे, अशी माहिती खडकपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने दिली.
४खडकपूर्णा प्रकल्पातून सोडलेले पाणी येलदरी प्रकल्पात दाखल होत आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
४६ आॅक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता येलदरी प्रकल्पात ७४.२२८ दलघमी जीवंत पाणीसाठा जमा झाला होता. या पाणीसाठ्याची टक्केवारी ९.१७ टक्के एवढी आहे.
४मागील २४ तासांत येलदरी प्रकल्पामध्ये ३.४५ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. तर १ जूनपासून आतापर्यंत ११४.५६ दलघमी पाण्याची आवक प्रकल्पात झाली. १ जूनपासून आतापर्यंत प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात ८०९ मि.मी. पाऊस झाला आहे. दरम्यान, खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने या प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे.