ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार; मुख्याध्यापकाला दिले निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 06:10 PM2024-09-25T18:10:55+5:302024-09-25T18:12:47+5:30

मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार; विद्यार्थ्यांनी शाळेत न येण्याचा केला निर्णय

Students boycott school until Maratha reservation from OBC; A statement given to the principal | ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार; मुख्याध्यापकाला दिले निवेदन

ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार; मुख्याध्यापकाला दिले निवेदन

- उद्धव देशमुख
गिरगाव (जि. हिंगोली):
मराठा समाजाला जोपर्यंत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत शाळेत न येण्याचा निर्णय कै. बेगाजी पाटील विद्यालयातील ७० विद्यार्थ्यांनी घेतला आहे. या संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकाने यास दुजोरा दिला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मागच्या आठ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करीत आहेत. परंतु अजूनही त्यांनी केलेल्या मागण्यांकडे शासन लक्ष देत नाही. त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत शाळेत न जाण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. मुख्याध्यापकांना दिलेल्या निवेदनावर विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

विद्यार्थ्यांनी शाळेत न येण्याचे दिले निवेदन...
मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत शाळेत न येण्याचा निर्णय २५ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी घेतला आहे. तशा प्रकारचे निवेदन शाळेला दिले आहे. ७० विद्यार्थ्यांनी पालकांच्या स्वाक्षरीसहित शाळेला निवेदन दिले आहे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत शाळेत येणार नाही या मुद्यावर विद्यार्थी ठाम आहेत. पण आम्ही विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलून यावर मार्ग काढत आहोत.
- मुख्याध्यापक व्ही. एस. देशमुख, गिरगाव

Web Title: Students boycott school until Maratha reservation from OBC; A statement given to the principal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.