प्राध्यापकांच्या संपावर तोडगा काढावा या मागणीसाठी परभणीत विद्यार्थ्यांचा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 04:39 PM2017-12-15T16:39:52+5:302017-12-15T16:41:38+5:30
विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सकाळी ११ वाजता विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना निवेदन सादर केले.
परभणी: विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सकाळी ११ वाजता विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना निवेदन सादर केले.
विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक ११ डिसेंबरपासून महाविद्यालयांना अनुदान देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी संपावर गेले आहेत. संपावर जावून आज पाचवा दिवस उजाडला आहे. तरी ही शासनाने या प्राध्यापकांच्या अनुदानाची दखल घेतली नाही. मात्र १२ वीतील विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने प्राध्यापकांच्या संपावर तोडगा काढून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या निवेदनावर ईश्वर ठाकूर, रोशन जाधव, ज्ञानेश्वर कदम, सुनील जाधव, डिगांबर मगर, बालासाहेब सातपुते, वैभव मुधोळ आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.