विद्यार्थ्यांनी सकारात्मक ऊर्जा जोपासून गुणवत्ता वृद्धिंगत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:13 AM2021-06-23T04:13:20+5:302021-06-23T04:13:20+5:30
परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात ‘यू जी सी स्टाईड’ यांच्या उपक्रमांतर्गत इंग्रजी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी ‘सॉफ्ट ...
परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात ‘यू जी सी स्टाईड’ यांच्या उपक्रमांतर्गत इंग्रजी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी ‘सॉफ्ट स्किल’ या विषयावर १८ ते २० जून या कालावधीत ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत १८ जून रोजी पहिल्या दिवशी साधन व्यक्ती म्हणून औरंगाबाद येथील प्रा. डॉ. नंदा देशमुख यांनी ‘कौशल्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. १९ जून रोजी साधन व्यक्ती म्हणून गंगापूर येथील डॉ. अजय देशमुख यांनी ‘भावनिक बुद्ध्यांक’ या विषयावर मार्गदर्शन केले. २० जून रोजी हैदराबाद येथील प्रा. डॉ. भीमराव भोसले यांनी ‘सामान्य जागरूकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, संयोजक प्रा. डॉ. विजया नांदापूरकर, सहसंयोजक प्रा. डॉ. यू. बी. किट्टेकर, उपप्राचार्य डॉ. एस. एन. केशेट्टी, डॉ. आर. एस. नितोंडे, डॉ. एम. ए. शेख रेहमान, आदींची उपस्थिती होती.