जिल्हाधिकाऱ्यांच्या अचानक भेटीने जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 04:56 PM2020-04-28T16:56:04+5:302020-04-28T17:00:14+5:30

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, आ़ डॉ़ राहुल पाटील मंगळवारी जायकवाडी परिसरात पोहचले़

A sudden visit of the District Collector, rushed to the office of Jayakwadi Irrigation Department | जिल्हाधिकाऱ्यांच्या अचानक भेटीने जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धांदल

जिल्हाधिकाऱ्यांच्या अचानक भेटीने जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धांदल

Next

परभणी :  येथील जायकवाडी परिसरातील जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयांना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचाकन भेट दिली़ या भेटीमुळे उपस्थित कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली़

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, आ़ डॉ़ राहुल पाटील मंगळवारी जायकवाडी परिसरात पोहचले़ हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यासह जिल्हाधिकाºयांनी याच भागात असलेल्या जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक १० या कार्यालयास भेट दिली़ यावेळी कार्यालयामध्ये केवळ एक कर्मचारी उपस्थित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ या भागात जायकवाडीचे जुने बंद असलेले विश्रामगृह असून, त्याच्या पाठीमागील बाजूस जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक १० या कार्यालयाचे कामकाज चालते़ जिल्हाधिकाºयांनी कार्यालयास भेट दिली

त्यावेळी या कार्यालयात एकच कर्मचारी उपस्थित होता़ इतर कर्मचाºयांविषयी विचारणा केली असता, ते लवकरच येतील, असे जिल्हाधिकाºयांना सांगण्यात आले़ या कार्यालयाच्या शेजारीच असलेल्या लघु पाटबंधारे विभाग क्रमांक २ कार्यालयासही मुगळीकर यांनी भेट दिली़ या ठिकाणीही केवळ एक महिला कर्मचारी उपस्थित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ राज्य शासनाने कार्यालयीन कर्मचाºयांच्या उपस्थितीत ५ टक्क्यांनी वाढ केली असून, एकूण कर्मचाºयांच्या तुलनेत किमान १० टक्के कर्मचारी उपस्थित असणे अपेक्षित होते; परंतु, दोन्ही कार्यालयात कर्मचाºयांची उपस्थिती दिसून आली नाही़ त्याच प्रमाणे या परिसरातील अस्वच्छतेबाबतही मुगळीकर यांनी नाराजी व्यक्त केली़ एकंदर जिल्हाधिकाºयांच्या अचानक भेटीने उपस्थित कर्मचाºयांची धावपळ झाल्याचे पहावयास मिळाले़

Web Title: A sudden visit of the District Collector, rushed to the office of Jayakwadi Irrigation Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.