५४१ हेक्‍टरवर उसाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:14 AM2020-12-08T04:14:32+5:302020-12-08T04:14:32+5:30

सोनपेठः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने मुद्‌गल व खडका बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सिंचन ...

Sugarcane cultivation on 541 hectares | ५४१ हेक्‍टरवर उसाची लागवड

५४१ हेक्‍टरवर उसाची लागवड

Next

सोनपेठः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने मुद्‌गल व खडका बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण झाले असून यावर्षी ५४१ हेक्टरवर उसाची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाच्या अहवालात झाली आहे. दरवर्षी शेतकऱ्यांचे अर्थचक्र खरीप व रब्बी हंगामावर अवलंबून असते. त्यानुसार शेतकरी देखील पेरणीसाठी नियोजन करतात. यावर्षी सोनपेठ तालुक्यात ३५ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. पेरणीनंतर पावसाने हजेरी लावल्याने पिके देखील जोमात आली होती. मात्र सोयाबीन काढणीच्या वेळी झालेल्या वातावरण बदलाचा फटका या पिकांना बसला. पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्याने नदी, नाले, तलाव, धरणे

ओसंडून वाहू लागली. या पावसाने पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. खरिपात झालेले नुकसान भरून काढू, अशी अपेक्षा ठेवत शेतकऱ्यांनी रब्बीची जोरदार तयारी केली आहे. कृषी विभागाने देखील रब्बीत शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पीक पद्धतीचे नियोजन केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोनपेठ तालुक्यात आतापर्यंत १३ हजार २९० हेक्टरवर ऊस, हरभरा, ज्वारी पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे.

हरभरा व उसाकडे शेतकऱ्यांचा वाढला कल

तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अतिवृष्टीचा पावसाने तालुक्यातील मुद्‌गल बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा झाला आहे. तसेच माजलगाव धरण भरल्यामुळे उजवा कालव्यावरील पाण्यावर ही शेतकऱ्यांना आशा आहेत. त्यामुळे तालुक्यात हरभरा व ऊस लागवडीकडे कल वाढला आहे. तालुक्यात ५४१ हेक्‍टरवर उसाची तर ६ हजार ३४७ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली आहे.

अशी झाली पेरणी

ज्वारी ५७३५, गहू ५२८, मका १२१, हरभरा ६ हजार ३४७ , ऊस ५४१ असा एकूण १३ हजार २९० हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली असून रब्बीसाठी सरासरी १२ हजार ६६९हेक्टर क्षेत्र आहे. जवळपास सरासरी क्षेत्राच्या १०४ टक्के रब्बीची पेरणी झाली आहे

Web Title: Sugarcane cultivation on 541 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.