न्यायालयाच्या आवारात शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 06:09 AM2018-03-13T06:09:08+5:302018-03-13T06:09:08+5:30
सख्ख्या भावासोबत झालेल्या शेतीच्या वादातून तुकाराम किशन जव्हार (६५) यांनी जिंतूर न्यायालयाच्या आवारात सोमवारी दुपारी विष प्राशन करून आत्महत्या केली.
जिंतूर (जि. परभणी) : सख्ख्या भावासोबत झालेल्या शेतीच्या वादातून तुकाराम किशन जव्हार (६५) यांनी जिंतूर न्यायालयाच्या आवारात सोमवारी दुपारी विष प्राशन करून आत्महत्या केली.
आसेगाव यथील तुकाराम जव्हार यांचा त्यांचा मोठा भाऊ सखाराम यांच्यासोबत शेत जमिनीबाबत वाद होता. जिंतूर न्यायालयात त्याची सुनावणी सुरू होती. तुकाराम यांच्या हिश्श्याच्या जमिनीवर काही प्रमाणात अतिक्रमण झाले होते. पोलिसांनी कारवाई न केल्याने शेतीचा वाद वाढल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी फेब्रुवारीत जिल्हाधिका-यांना अर्ज देऊन त्यात मोठा भाऊ सखाराम हा दुसरा भाऊ नामदेव किशन जव्हार यास आपील दाखल करू नको, म्हणून सांगत आहे. त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते.