तीन सुट्यांनंतर शासकीय कार्यालयात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:15 AM2020-12-29T04:15:26+5:302020-12-29T04:15:26+5:30

शुक्रवारी ख्रिसमसची सुटी आणि त्यानंतर शनिवार व रविवार असे दोन दिवस सुटीचे आल्याने शासकीय कार्यालयांना सलग तीन दिवस सुटी ...

Sukshukat in government office after three holidays | तीन सुट्यांनंतर शासकीय कार्यालयात शुकशुकाट

तीन सुट्यांनंतर शासकीय कार्यालयात शुकशुकाट

Next

शुक्रवारी ख्रिसमसची सुटी आणि त्यानंतर शनिवार व रविवार असे दोन दिवस सुटीचे आल्याने शासकीय कार्यालयांना सलग तीन दिवस सुटी मिळाली. सोमवारी शासकीय कामकाज सुरू झाल्याने तीन दिवसांपासून रखडलेली कामे हातावेगळी करावी लागणार; परंतु सोमवारीही या कार्यालयात शुकशुकाट आणि निवांतपणा अनुभवायास मिळाला. शहरातील पंचायत समिती कार्यालयाला दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास भेट दिली. तेव्हा या कार्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागात एकाही टेबलवर कर्मचारी उपस्थित नव्हता. अशीच परिस्थिती मनरेगा, पंचायत विभागात पाहावयास मिळाली. काही कर्मचारी उशिराने दाखल झाले; परंतु ते कक्षात उपस्थित नसल्याचे पाहावयास मिळाले.

प्रशासकीय इमारत भागातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातही चक्क शुकशुकाट दिसून आला. या विभागात केवळ एक महिला कर्मचारी उपस्थित होती. उर्वरित कर्मचारी तपासणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात गेल्याची माहिती देण्यात आली. त्याच प्रमाणे निरंतर शिक्षणाधिकारी कार्यालयातही केवळ दोनच कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे सुटीनंतरही सोमवारचा दिवस या शासकीय कार्यालयांमध्ये निवांतपणाचाच गेला.

अधिकारीही गैरहजर

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच सहायक गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षाला चक्क कुलूप होते. जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांचा कक्ष रिकामा होता. तसेच निरंतर शिक्षणाधिकारी, पशुसंवर्धनचे सहायक उपायुक्त यांच्या कक्षातील खुर्च्या रिकाम्या असल्याचे पाहावयास मिळाले.

Web Title: Sukshukat in government office after three holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.