एक लाख नागरिकांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 10:55 PM2020-03-20T22:55:38+5:302020-03-20T22:56:13+5:30

कोरोना आजाराच्या अनुषंगाने खरबदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत गेल्या चार दिवसांत ९९ हजार ५२२ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे़ त्यामध्ये ५२२ जणांना श्वसन विकाराची लक्षणे आढळून आली आहेत़

Survey of one million citizens | एक लाख नागरिकांचे सर्वेक्षण

एक लाख नागरिकांचे सर्वेक्षण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोना आजाराच्या अनुषंगाने खरबदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत गेल्या चार दिवसांत ९९ हजार ५२२ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे़ त्यामध्ये ५२२ जणांना श्वसन विकाराची लक्षणे आढळून आली आहेत़
ताप, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आदी श्वसन विकार असणारे नागरिक शोधण्याच्या दृष्टीकोणातून तसेच परराज्यातून व परदेशातून कोणते नागरिक प्रशासनाला माहिती न देता जिल्ह्यात दाखल झाले आहेत, याबाबतची माहिती उपलब्ध व्हावी, या दृष्टीकोणातून जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या वतीने १७ मार्चपासून सर्वेक्षण करण्यात येत आहे़ या अंतर्गत २० मार्चपर्यंत या अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांनी ९९ हजार ५२२ नागरिकांचे सर्वेक्षण केले़ त्यामध्ये ५२२ नागरिकांना श्वसन विकाराची लक्षणे आढळून आली़ यातील ६३ जणांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी संदर्भित करण्यात आले़ देशांतर्गत विविध राज्यातून ७ हजार २५ नागरिक आल्याचे समोर आले़ तर विदेशातून ७ नागरिक आले. ज्यांनी प्रशासनाला या संदर्भातील माहिती दिली नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे़ या सातही जणांची शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली़
सेलूत दोघांचे नमुने घेतले
४सेलू : शहरात दोघे जण अमेरिकेतून आल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी जावून शुक्रवारी स्वॅबचे नमुने घेतले व ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले़ या संदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ़ संजय हरबडे यांनी या व्यक्तीची तपासणी केली़ त्यावेळी त्यांना कोरोना संदर्भातील कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत़

Web Title: Survey of one million citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.