शासकीय योजनांसाठी ज्येष्ठांचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:22 AM2021-08-12T04:22:14+5:302021-08-12T04:22:14+5:30
परभणी : जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वेक्षणाला प्रारंभ झाला असून, या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळतो की नाही, याविषयीची माहिती ...
परभणी : जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वेक्षणाला प्रारंभ झाला असून, या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळतो की नाही, याविषयीची माहिती संकलित करून ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे.
औरंगाबाद विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्या अंतर्गत परभणी जिल्ह्यातही ६० वर्षांपुढील नागरिकांचे आशाताई, अंगणवाडीताई यांच्यामार्फत सर्वेक्षण केले जात आहे. १५ ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या याद्या डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या माध्यमातून ऑनलाइन केल्या जाणार आहेत.
ज्येष्ठ नागरिकाचे नाव, गाव, वय, कुटुंबातील सदस्य, घराचा प्रकार, मिळकतीचे साधन, शौचालय, स्वयंपाकाचे साधन, जमीन मालकी, त्याचे वाद, बँक खाते, दवाखाना, तपासणी, उपाचार, दिव्यंगत्व, श्रवणयंत्र, कलागुण, छंद, आवक, आधार व रेशन कार्ड आदी मुद्द्यांची माहिती संकलित केली जात आहे.
या सुविधा मिळणार
गावातील शाळा, समाज मंदिर, इतर सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष निर्माण करणे, इंटरनेट, टीव्ही, पेपर, मासिक आदी वाचन साहित्य उपलब्धी करणे, खुली व्यायाम शाळा उभारणे, हा खर्च ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केला जाणार आहे, ज्येष्ठ मंडळींना मदत करण्यासाठी प्रत्येक गावात पाच ते सहा होतकरू युवकांचा सारथी गट तयार करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.