पाथरीत दुध केंद्रातील कुलर दुरुस्तीच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 07:26 PM2018-03-15T19:26:36+5:302018-03-15T19:28:36+5:30
ल्क कुलर बंद पडल्याने येथील दूध संकलन केंद्रावर दोन दिवसांपासून दूध संकलित केले जात नव्हते. यामुळे आज संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाच पवित्रा घेतला.
पाथरी ( परभणी ) : बल्क कुलर बंद पडल्याने येथील दूध संकलन केंद्रावर दोन दिवसांपासून दूध संकलित केले जात नव्हते. यामुळे आज संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाच पवित्रा घेतला. मात्र केंद्रातील कुलर 22 मार्च पर्यंत दुरुस्त करून दिले जाईल असे आश्वासन संस्थेने दिल्यानंतर शेतकऱ्यांनी शांत होत आंदोलन स्थगित केले.
पाथरी येथील शासकीय दूध संकलन केंद्रातील दोन बल्क कुलर बंद पडल्याने या केंद्रावर दूध संकलन बंद करण्याचा निर्णय बुधवार 14 मार्च पासून अचानक घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी बुधवारी आक्रमक झाली होती. शेतकरी संतप्त झाल्याचे पाहून शासकीय दूध योजना परभणी कार्यालयाच्या वतीने त्यांचे दूध शासनाच्या वतीने परभणी येथे रवाना करण्यात आले.मात्र आज सकाळी शेतकरी दुधाच्या गाड्यासह येथील दूध संकलन केंद्रावर येऊन दाखल झाले असता दुध संकलनाची कोणतीच व्यवस्था नसल्याने ते संतप्त झाले. यावर शेतकरी आंदोलाच्या पवित्र्यात रस्त्यावर उतरली. या दरम्यान परभणी येथील कार्यालयाने शेतकरी व आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या सोबत चर्चा केली. यावेळी कार्यालयाकडून 22 मार्च पर्यंत केंद्रातील बल्क कुलर सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावर शेतकऱ्यांनी शांत होत आंदोलन स्थगित केले अशी माहिती विठ्ठल गिराम यांनी दिली. आश्वासनानंतर शेतकरी शांत झाले मात्र त्यांना आपल्या दुधाच्या गाड्या शेवटी परभणी येथे घेऊन जाव्या लागल्या.