मुरुंबा येथील २७ जणांचे घेतले स्वॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:41 AM2021-01-13T04:41:43+5:302021-01-13T04:41:43+5:30
दोघांचे रक्तजल नमुने घेतले गावातील दोन रुग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात आले असून, ते हिवताप व डेंग्यूच्या तपासणीसाठी जिल्हा सामान्य ...
दोघांचे रक्तजल नमुने घेतले
गावातील दोन रुग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात आले असून, ते हिवताप व डेंग्यूच्या तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. जिल्हा हिवताप कार्यालयाने गावात सवर्क्षेण केले आहे. या पथकाने ९ जानेवारी रोजी ५२ घरांना भेट देऊन पाहणी केली. त्यात ३ दूषित भांडी आढळली. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकानेही ९ व १० जानेवारी रोजी गावात कंटेनर सर्व्हे केला आहे. त्यात ५१८ भांड्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ७ दूषित भांडे आढळले. गावात ३.१९ आणि १० जानेवारी रोजी १.३३ हाऊस इंडेक्स आढळल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
घाबरु नका, काळजी घ्या
बर्ड फ्लू हा आजार पक्ष्यांमधून मानवाला होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये. आरोग्य विभाग, हिवताप विभाग आणि पशुसंवर्धन विभागातील अधिकारी- कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून राहणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. काही लक्षणे आढळली तर आरोग्य अधिकाऱ्यांना तत्काळ कळवावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी. देशमुख यांनी केले आहे.