कर्मचाऱ्यांसह नागरिकांची स्वँब तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:22 AM2020-12-30T04:22:39+5:302020-12-30T04:22:39+5:30

नावातील बदलामुळे संभ्रमावस्था देवगावफाटा- ग्रामपंचायत निवडणुकीस ग्रामीण भागात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रां.प. सदस्यांसाठी आगोदर ऑनलाईन नामनिर्देशन भरावे लागत आहे. ...

Swam inspection of citizens with staff | कर्मचाऱ्यांसह नागरिकांची स्वँब तपासणी

कर्मचाऱ्यांसह नागरिकांची स्वँब तपासणी

Next

नावातील बदलामुळे संभ्रमावस्था

देवगावफाटा- ग्रामपंचायत निवडणुकीस ग्रामीण भागात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रां.प. सदस्यांसाठी आगोदर ऑनलाईन नामनिर्देशन भरावे लागत आहे. मागासवर्गीय उमेदवारांचा शोध घेणे, जात प्रमाणपत्र व वैधतेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना पॅनलप्रमुखांची कसरत होत आहे. नामनिर्देशन भरण्यासाठी पॅनलप्रमुखांचा मुक्काम शहरातील नेटकॅफेवर होत आहे. त्यातच अनेकांचे मतदार यादीत एक नाव तर आधार कार्डवर दुसरेच नाव असल्यामुळे पॅनलप्रमुख सदस्यांना ‘तुमचे खरे नांव सांगा’, असे विचारावे लागत असल्याने गमंती- जमतीचे कस्से ऐकावयास मिळत आहेत.

मराठवाडा एक्स्प्रेस रेल्वे सुरू झाल्याने समाधान

देवगावफाटा- मराठवाड्यातील प्रवाशांची मदार असलेली धर्माबाद - मनमाड ही मराठवाडा एक्स्प्रेस रेल्वे गुरुवारपासून सुरू झाली आहे. औरंगाबाद व नांदेड मार्गावरील प्रवाशांना ही रेल्वे सेवा सोयीची झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

शेकोट्या पेटू लागल्या

देवगावफाटा- सेलू शहर व ग्रामीण भागात मागील १५ दिवसांत थंडी वाढली असून, स्वेटर, मफलर, कानटोपीचा वापरही वाढला आहे. त्यातच सकाळी व सायंकाळी उब मिळावी यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. रात्री मात्र शेकोट्या पेटवून रात्री उशिरापर्यंत निवडणुकीच्या गप्पा रंगत आहेत.

रानडुकरांमुळे शेतकऱ्यांचा मुक्काम शेतात

देवगावफाटा- सेलू तालुक्यातील ग्रामीण भागात शेत जमिनीवर रानडुक्करांचा वावर वाढला असून, शेतातील रब्बी पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पर्याय म्हणून शेतकरी रात्री शेतातच मुक्काम करीत आहेत.

Web Title: Swam inspection of citizens with staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.