विहिरीत उतरून टाकसाळे यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:22 AM2020-12-30T04:22:45+5:302020-12-30T04:22:45+5:30

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिंतूर तालुक्यात वैयक्तिक सिंचन विहिरींची कामे सुरु आहेत. ही कामे प्रत्यक्षात चालू आहेत किंवा ...

Takasale inspected the well | विहिरीत उतरून टाकसाळे यांनी केली पाहणी

विहिरीत उतरून टाकसाळे यांनी केली पाहणी

Next

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिंतूर तालुक्यात वैयक्तिक सिंचन विहिरींची कामे सुरु आहेत. ही कामे प्रत्यक्षात चालू आहेत किंवा नाहीत, त्या ठिकाणी मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे किंवा नाही. याबाबतची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सोमवारी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत अकोली येथील लाभधारक शेतकरी बालासाहेब देवराव अंभोरे यांच्या विहिरीची प्रत्यक्ष पाहणी केली. लाभधारकास शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व सहभाग घेण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन मार्गदर्शन केले. त्याचबरोबर वरुड नृ. येथील अरुण सुरेश थिटे यांच्या वैयक्तिक सिंचन विहिरीमध्ये उतरून मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे़ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी विहीरीत उतरुन कामाची पाहणी केली. सिंचन हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून येणाऱ्या काळामध्ये आपण वैयक्तिक सिंचन विहीरच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणून शेतकरी समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळे यांनी सांगितले. त्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीवर विशेष लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी गट विकास अधिकारी शिवाजी कांबळे तसेच पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Takasale inspected the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.