टाकसाळे यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:17 AM2021-01-25T04:17:48+5:302021-01-25T04:17:48+5:30
भाजीपाला पिकात भुरी रोगाचा प्रादुर्भाव परभणी : जिल्ह्यातील मिरचीच्या पिकात भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाचे व्यवस्थापन ...
भाजीपाला पिकात भुरी रोगाचा प्रादुर्भाव
परभणी : जिल्ह्यातील मिरचीच्या पिकात भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी मायक्लोब्युटनील १० टक्के डब्लूपी १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, मिरची- भाजीपाला पिकांत रस शोषण करणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव आढळल्यास व्यवस्थापनासाठी पायरीप्रॉक्सिफेन १० टक्के ईसी ४ मिलि किंवा फेन्प्रोपाथ्रीन १० टक्के ईसी ४ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.
जिल्ह्यात पारा ३२ अंशावर
परभणी : जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ झाली असून, किमान तापमान कमी झाले आहे. शनिवारी कमाल तापमान ३२.६ अंश नोंदले गेले. मागील आठवडाभरापासून तापमानात वाढ होत आहे. दिवसाचे तापमान वाढत असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे, तर किमान तापमानात घट झाल्याने सायंकाळी वातावरणात गारवा निर्माण झाला होता.