आमिष दाखविणाऱ्या पोलिसावर कारवाई करा: परभणी जिल्हाधिकºयांना घातले साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:15 AM2018-03-15T00:15:06+5:302018-03-15T00:15:22+5:30
नोकरीचे खोटे आमिष दाखवून बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक करणाºया पोलीस कर्मचाºयाविरुद्ध कारवाई करून पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नोकरीचे खोटे आमिष दाखवून बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक करणाºया पोलीस कर्मचाºयाविरुद्ध कारवाई करून पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाºयाने गॅस एजन्सी देतो, प्लॉट घेऊन देतो तसेच नोकरी लावतो, अशी बतावणी करून अनेकांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात फसवणूक केली असतानाही पोलीस कर्मचाºयावर कारवाई मात्र केली जात नाही.
त्यामुळे फसवणुकीचे कारनामे अजूनही सुरू आहेत. तेव्हा सदर पोलीस कर्मचाºयावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनियरचे जिल्हाध्यक्ष सरदार चंदासिंग यांच्यासह इतरांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.