संविधानाची प्रत जाळणाऱ्यावर कारवाई करा; परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 03:24 PM2018-08-11T15:24:58+5:302018-08-11T15:27:11+5:30

संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी, या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. भीम आर्मी संघटना आणि रिपब्लिक सेनेच्या वतीने केलेल्या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Take action against those who burn constitution copies; Demonstrations before Parbhani District Collectorate | संविधानाची प्रत जाळणाऱ्यावर कारवाई करा; परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

संविधानाची प्रत जाळणाऱ्यावर कारवाई करा; परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Next

परभणी- संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी, या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. भीम आर्मी संघटना आणि रिपब्लिक सेनेच्या वतीने केलेल्या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर ९ आॅगस्ट रोजी संविधानाची प्रत जाळून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन संपूर्ण भारतीयांचा अवमान केला. जातीय तेढ निर्माण करण्यासाठी जाणुनबुजून हे कटकारस्थान करण्यात आले असून या प्रकरणी देश विघातक कृत्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या निदर्शने आंदोलनाद्वारे करण्यात आली. आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. भीम आर्मी संघटनेचे जिल्हाप्रमुख कचरु गोडबोले, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत जोंधळे, प्रशांत ढगे, सुधाकर वाघमारे, विनोद जोंधळे, बुद्धपाल कांबळे, धम्मदीप मोगले, प्रमोद जोंधळे, मंगेश मस्के आदींची नावे आहेत.

रिपब्लिकन सेना
रिपब्लिकन सेनेच्या वतीने शनिवारी याच मागणीसाठी निदर्शन आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर जिल्हाप्रमुख महेंद्र सानके, सुधाकर वाघमारे, अच्युतराव घुगे, बाबासाहेब हारबडे, चंद्रकांत लहाने, रमेश भिंगारे, शरद एडके, सुभाष गायकवाड, महेश घुगे, तुकाराम मुंढे आदींची नावे आहेत.
 

Web Title: Take action against those who burn constitution copies; Demonstrations before Parbhani District Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.