संजय जाधव हा घ्या पुरावा, आता घेणार का राजकीय संन्यास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:22 AM2021-08-12T04:22:12+5:302021-08-12T04:22:12+5:30

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीवरून शिवसेना-राष्ट्रवादीत वाद सुरू झाला आहे. घनसावंगी येथील शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार जाधव यांनी आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या ...

Take Sanjay Jadhav as proof, will he take political retirement now? | संजय जाधव हा घ्या पुरावा, आता घेणार का राजकीय संन्यास?

संजय जाधव हा घ्या पुरावा, आता घेणार का राजकीय संन्यास?

Next

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीवरून शिवसेना-राष्ट्रवादीत वाद सुरू झाला आहे. घनसावंगी येथील शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार जाधव यांनी आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीबाबत शिफारस केल्याचे सांगितले होते. त्यावेळी राष्ट्रवादीने या प्रश्नावरून रान उठविले, असे सांगून त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. तसेच राष्ट्रवादीला कधीही पायाखाली घेऊ, असे ते म्हणाले होते. हे प्रकरण सोमवारी दिवसभर चर्चेला आल्यानंतर त्यांनी रात्री स्पष्टीकरण दिले होते. त्यात आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला. आपण कार्यकर्त्यांच्या भावना भाषणातून व्यक्त केल्या होत्या. मी माझ्या आयुष्यात कधीही चुकीचे काम केले नाही. जर कुठे चुकीचे वागलो असेल तर पुरावा द्या, राजकारणातून संन्यास घेईल, असे एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितले होते. त्यांच्या या आवाहनानुसार राष्ट्रवादीचे परभणी तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना पत्र दिले असून, त्यात परभणी शहरातील सर्व्हे नं.४० व ५२ येथील जमीन प्रकरणात खासदार जाधव यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर दबाव टाकून कमी क्षेत्र असताना जास्तीच्या क्षेत्राची रजिस्ट्री करून घेतली. त्यावर आपण आक्षेप नोंदविला. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांच्याकडे १५ मार्च २०२१ रोजी केली; परंतु कुंडेटकर यांनी कारवाई केली नाही. जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल या रुजू होताच कारवाईच्या भीतीने कुंडेटकर यांनी ९ ऑगस्ट रोजी तो फेरफार रद्द केला. या प्रकरणात संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात खा. संजय जाधव यांनी दबाव टाकल्याचे म्हटले आहे, असेही देशमुख म्हणाले. आता शासकीय कर्मचाऱ्यांनीच खासदार जाधव यांच्या दबावामुळे चुकीचा फेरफार केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी चुकीचे काम केल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणून ते आता राजकीय संन्यास घेणार का? असा सवाल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Take Sanjay Jadhav as proof, will he take political retirement now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.