तलाठी पदभरती : परभणी जिल्ह्यात ८१ उमेदवारांना मिळाल्या नियुक्त्या
By ज्ञानेश्वर भाले | Updated: March 16, 2024 19:15 IST2024-03-16T19:08:54+5:302024-03-16T19:15:23+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : रिक्त जागेनुसार जिंतूर, परभणीत पदस्थापना

तलाठी पदभरती : परभणी जिल्ह्यात ८१ उमेदवारांना मिळाल्या नियुक्त्या
परभणी : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट "क" संवर्गातील तलाठी पदभरतीत (२०२३) जिल्हा आस्थापनेवर रिक्त असलेल्या ८१ जणांना नियुक्त्या देण्यात आला. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी काढले आहे. रिक्त असलेल्या तलाठी संवर्गातील ९५ पदांची भरतीचीर प्रक्रिया राबविण्यात आली होती. यासाठी एकूण २१ हजार ४३३ उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज भरले हाेते. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरदरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती.
या पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भात ८१ उमेदवारांना तलाठी पदावर नियुक्तीचे आदेश देण्यात आले. यात परभणी तालुक्यात १४, पुर्णा १०, पालम ८, गंगाखेड ९, सोनपेठ ६, पाथरी ६, मानवत ५, सेलू ८ आणि जिंतूर तालुक्यात १५ जणांना नियुक्ती देण्यात आली. संबंधितांना तातडीने नियुक्तीचे आदेश असल्याने त्यानुसार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी याबाबत निर्देश काढलेत. यात अनुकंपा यादीतील २ उमेदवारांना महसूल सहायक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह आस्थापना विभागातील कर्मचारी यांनी काम पाहिले.