पुरुष गटात तळेकर, महिला गटात अंभुरे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:26 AM2021-02-23T04:26:13+5:302021-02-23T04:26:13+5:30

परभणी : जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त येथील योग साधना केंद्र शिवाजीनगर आणि अ.भा. योगशिक्षक महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या सूर्यनमस्कार स्पर्धेत ...

Talekar in men's group, Ambhure first in women's group | पुरुष गटात तळेकर, महिला गटात अंभुरे प्रथम

पुरुष गटात तळेकर, महिला गटात अंभुरे प्रथम

Next

परभणी : जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त येथील योग साधना केंद्र शिवाजीनगर आणि अ.भा. योगशिक्षक महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या सूर्यनमस्कार स्पर्धेत पुरुष गटात अशोक तळेकर यांनी तर महिला गटात हर्षदा अंभुरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.

जागतिक सूर्यनमस्कार दिन आणि शिवजयंतीच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. योग साधना केंद्राचे अध्यक्ष सुभाषराव जावळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी अ.भा. योगशिक्षक महासंघाचे महासचिव कृष्णा कवडी, योगशिक्षक सूर्यकांत सातोनकर, प्रा.रामविलास लड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. डाॅ. दीपक महिंद्रकर यांनी प्रास्ताविक केले.

शिवाजीनगर येथील योगसाधना केंद्रात २१ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले. या कार्यक्रमास सुभाषराव जावळे, डॉ.चारुशिला जवादे, कृष्णा कवडी यांची प्रमुख उपस्थिती होती. अशोक तळेकर यांनी सूत्रसंचालन केले. रामविलास लड्डा यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाढोनकर, स्मिता पाटील, अनूराधा सातोनकर, भारती महेंद्रकर आदींनी प्रयत्न केले.

स्पर्धेचा निकाल असा

पूरूष गट : अशोक तळेकर (प्रथम), प्रविण सराफ (व्दितीय), चंद्रकांत देशमूख (तृतीय), प्रेम राजू कदम, गौरव लड्डा (प्रोत्साहनपर)

महिला गट :- हर्षदा अंबूरे (प्रथम), शरयू यादव (व्दितीय), नेहा यादव (तृतिय), योजना आळंदकर, वदंना कापसे (प्रोत्सानपर). सर्व विजेत्या स्पर्धकांचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Talekar in men's group, Ambhure first in women's group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.