परभणी जिल्ह्यात तालुका कृषी अधिकाºयाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:38 AM2018-03-01T00:38:56+5:302018-03-01T00:39:31+5:30
नव्यानेच रुजू झालेल्या तालुका कृषी अधिकाºयास पाईपने मारहाण झाल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील झिरो फाट्याजवळ घडली़ जखमी कृषी अधिकाºयांवर परभणीच्या शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत़ २८ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा : नव्यानेच रुजू झालेल्या तालुका कृषी अधिकाºयास पाईपने मारहाण झाल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील झिरो फाट्याजवळ घडली़ जखमी कृषी अधिकाºयांवर परभणीच्या शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत़ २८ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़
जी़ई़ खुपसे हे काही दिवसांपूर्वीच पूर्णा येथे तालुका कृषी अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत़ २७ फेब्रुवारी रोजी कार्यालयीन कामकाज आटोपून परभणी येथे होणाºया बैठकीसाठी त्यांच्या चारचाकी वाहनातून ते परभणीकडे जात होते़ त्यांची गाडी झिरोफाट्याजवळ आल्यानंतर पाठीमागून येणाºया एका वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली़ त्यामुळे खुपसे यांच्या वाहनाच्या चालकाने गाडी थांबविली़ काही विचारण्याच्या आधीच पाठीमागील गाडीतील एका व्यक्तीने पाईपच्या सहाय्याने खुपसे यांना मारहाण केली व आरोपी तेथून पसार झाले़ या मारहाणीत जखमी झालेल्या खुपसे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, ही मारहाण कोणी व कोणत्या कारणावरून केली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही़
या प्रकरणी बुधवारी पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़
संघटनांनी प्रशासनाला दिले कारवाईचे निवेदन
या प्रकरणी बुधवारी कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक संघटनांनी निवासी उपजिल्हाधिकाºयांना निषेधाचे निवेदन दिले़ निवेदनात म्हटले आहे की, कृषी अधिकाºयांना झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे कर्मचारी मानसिक तणावाखाली आहेत. तेव्हा अशा निंदनीय घटनांना पायबंद घालण्यासाठी आरोपीस तात्काळ अटक करावी. जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही, तोपर्यंत शासकीय कामकाजावर बहिष्कार टाकत असल्याचेही या निवेदनात नमूद केले आहे़