सहा हजार हेक्टरवरील तूर पीक गेले वाळून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:42 AM2020-12-17T04:42:47+5:302020-12-17T04:42:47+5:30
खरीप हंगामात पेरणी केलेले सोयाबीन व कापूस पीक ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हातचे गेले. शेतकऱ्यांची मदार तूर पिकावर होती. मात्र, ...
खरीप हंगामात पेरणी केलेले सोयाबीन व कापूस पीक ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हातचे गेले. शेतकऱ्यांची मदार तूर पिकावर होती. मात्र, अचानक बोरी कृषी मंडळातील तूर पीक वाळून जात आहे. त्यामुळे ६ हजार हेक्टरवरील तुरीचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकावर केलेला खर्चही वाया गेला आहे. बोरी कृषी मंडळातील कौसडी, बोरी मारवाडी, गोंधळ, नागठाणा, मुडा, कोक, कसर, पिंप्री, निवळी, वरणा आदी गावांतील १५९ शेतकऱ्यांनी तूर पिकांच्या नुकसानीची तक्रार तहसील प्रशासनाकडे केली आहे. निवेदनावर बाबाराव गोरे, सुभाष घोलप, दत्तराव चौधरी, वैजनाथ चौधरी, भीमराव चौधरी, बाबासाहेब गोरे, गोविंद कंठाळे, नारायण कंठाळे, राम लोखंडे, दिगंबर लाखकर, तुकाराम गोरे, गंगाधर शिंपले, लक्ष्मण गोरे यांच्यासह १५९ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.