सर्वसामान्यांच्या विरोधातील सरकारला धडा शिकवा : सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 07:20 PM2019-09-10T19:20:15+5:302019-09-10T19:21:40+5:30
अर्थव्यवस्था कोलमडली असून व्यापार ठप्प झाला आहे.
जिंतूर : नोटबंदी व जीएसटीसारख्या निर्णयाने संपूर्ण देशातील सामान्य माणूस देशोधडीला लागला आहे. याच सोबत या सरकारच्या कार्यकाळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. हे सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे नाही अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची सवांद यात्रेनिमित्त जिल्हा परिषद मैदानावर सभा झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. त्या म्हणाल्या, शेतकरी कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबत सरकारला काही देणे घेणे नाही. राज्यामध्ये या सरकारच्या कार्यकाळात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. शासनाने केलेली कर्जमाफी ही ही फसवी आहे. शासन शेतकरीविरोधी आहे. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून व्यापार ठप्प झाला आहे. हाताला काम नाही बेरोजगारी वाढली आहे. सामान्य माणसाचे जीवन जगणे कठीण झाले असून सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली.