मास्कच्या तपासण्यांना पहिल्याच दिवशी फाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:47 AM2021-02-20T04:47:42+5:302021-02-20T04:47:42+5:30
पथकांनी पहिल्या दिवशी कारवाईला फाटा दिला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी बैठक घेऊन ...
पथकांनी पहिल्या दिवशी कारवाईला फाटा दिला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी बैठक घेऊन मनपा अंतर्गत १५ पथके स्थापन करुन विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या बैठकीत मनपाच्या पथकांनी यापूर्वी केलेल्या कारवाईबाबतही नाराजी व्यक्त केली? होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनंतरही मनपाच्या वतीने गुरुवारी शहरात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. नेहमीप्रमाणे नागरिक शहरातील रस्त्यांवरुन विनामास्क फिरत होते. ना फिजिकल डिस्टन्स पाळले जात होते ना ही मास्कचा वापर झाला. त्यामुळे नागरिकांच्या बेफिकिरी बरोबरच महानगरपालिका प्रशासनाची उदासीनता ही दिसून आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे मनपाने किती पथकांची स्थापना केली? या पथकांत कोणाचा समावेश आहे पथकांवर कोणत्या भागाची जबाबदारी दिली याची माहितीही देण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही मनपाची उदासीनता दिसून आली.