स्टंटबाजी तरुणांच्या अंगलट; पुराच्या पाण्यात उडी मारणाऱ्या दोघांना तहसीलदारांचे समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 01:31 PM2021-09-08T13:31:05+5:302021-09-08T13:31:28+5:30

rain in Parabhani : पूर परिस्थितीचे गांभीर्य सोडून अशी जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्यांना आवर घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.

Tehsildar summons two for jumping into flood waters | स्टंटबाजी तरुणांच्या अंगलट; पुराच्या पाण्यात उडी मारणाऱ्या दोघांना तहसीलदारांचे समन्स

स्टंटबाजी तरुणांच्या अंगलट; पुराच्या पाण्यात उडी मारणाऱ्या दोघांना तहसीलदारांचे समन्स

Next

देवगावफाटा (परभणी ) : अतिवृष्टीमुळे सेलू तालुक्यातील कुपटा येथील पूर आलेल्या नदी पात्रात काही कारण नसताना उडी घेऊन दोन युवकांनी स्टंटबाजी केल्याची घटना रविवारी घडली होती. त्यानंतर स्टंटबाजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. ही स्टंटबाजी आता युवकांच्या अंगलट आली असून तहसीलदार तथा तालूका दंडाधिकारी बालाजी शेवाळे यांनी त्यांना समन्स बजावले आहे. ( Tehsildar summons two for jumping into flood waters ) 

जोरदार पावसाने सेलू तालुक्यात नदीनाल्यांना पुर आलेला आहे. रविवारी कुपटा गावालगतच्या नदीला पूर आला होता. यावेळी बाळु ज्ञानु शिंदे व बाकु लिंबाजी दवंडे हे युवक पाण्याखाली गेलेल्या पुलावर गेले. तसेच विनाकारण पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या. त्यानंतर दोघेही पोहून बाहेर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पूर परिस्थितीचे गांभीर्य सोडून अशी जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्यांना आवर घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. दरम्यान, आपला जीव धोक्यात घालत ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण केली, सार्वजनीक शांततेस बाधा आणल्याने तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी बालाजी शेवाळे यांनी दोन्ही युवकांना समन्स बजावला आहे. युवकांविरोधात भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ प्रकरण ८, कलम १०७  नमुना १ क्रमांक १४ संभाव्य शांतताभंगाच्या माहितीवरुन  कलम ११३ अन्वये या दोघांविरूध्द CRPC US १०७ ची कार्यवाही करून आज समन्स बजावले. त्यांना ९ सप्टेंबर रोजी तालुका दंडाधिकारी सेलू यांच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा - पुरात वाहून गेलेल्या माजी आमदाराच्या मुलाचा आणि नातवाचा मृतदेह सापडला

Web Title: Tehsildar summons two for jumping into flood waters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.