तेलंगणा पोलिसांनी परभणीतून दोन सराफा व्यापा-यांना उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:32 AM2017-12-21T00:32:17+5:302017-12-21T10:45:30+5:30

दरोड्यातील चोरीचे सोने खरेदी केल्यावरुन बुधवारी तेलंगणा पोलिसांनी दोन सराफा व्यापाºयांना उचलले असून हे पोलीस परतीच्या प्रवासाला निघाल्याने व्यापाºयांचे अपहरण झाल्याची चर्चा शहरभर पसरली. दरम्यान, गंगाखेड पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर राणीसावरगाव रस्त्यावर जेसीबी आडवी लावून दोन्ही वाहने थांबविण्यात आली.

The Telangana police picked up two bullion trades from Parbhani | तेलंगणा पोलिसांनी परभणीतून दोन सराफा व्यापा-यांना उचलले

तेलंगणा पोलिसांनी परभणीतून दोन सराफा व्यापा-यांना उचलले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : दरोड्यातील चोरीचे सोने खरेदी केल्यावरुन बुधवारी तेलंगणा पोलिसांनी दोन सराफा व्यापाºयांना उचलले असून हे पोलीस परतीच्या प्रवासाला निघाल्याने व्यापाºयांचे अपहरण झाल्याची चर्चा शहरभर पसरली. दरम्यान, गंगाखेड पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर राणीसावरगाव रस्त्यावर जेसीबी आडवी लावून दोन्ही वाहने थांबविण्यात आली.
येथील सराफा व्यापारी प्रशांत तापडिया व रवंींद्र उडानशिव यांना २० डिसेंबर रोजी एपी २८/ सीएच ८०९२ आणि डीएल ७/ सीजी ६४९९ या परराज्यातील वाहनात टाकून ही वाहने भरधाव वेगाने शहराबाहेर निघून गेली. या घटनेमुळे काहींनी वाहनांचा पाठलाग केला. तर काही व्यापाºयांनी दोन व्यापाºयांचे अपहरण झाले असून ही वाहने राणीसावरगावकडे गेल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरुन पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी पिंपळदरी ठाण्याचे सपोनि अरविंद खंदारे यांना माहिती दिली. त्यावरुन राणीसावरगाव चौकीतील एएसआय गुºहाळे यांनी राणीसावरगावात जेसीबी आडवी लावून ही दोन्ही वाहने अडविली. वाहनातील व्यक्तींनी आपण तेलंगणा पोलीस असल्याचे सांगितले. तेवढ्यात या वाहनांचा पाठलाग करीत गंगाखेड पोलीस ठाण्यातील जमादार अण्णा मानेबोईनवाड, भारत तावरे, शेख जिलानी, सुग्रीव कांदे, सतीश दैठणकर हे राणीसावरगाव येथे पोहचले. त्यामुळे हे प्रकरण अपहरणाचे नसून चोरीचे सोने खरेदी करण्याचे असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद न करता दोन सराफा व्यापाºयांना बळजबरीने उचलल्याचा आरोप करीत व्यापाºयांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात ठाण मांडले. त्यामुळे अडविलेली दोन्ही वाहने गंगाखेड पोलीस ठाण्यात आणली. तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवला पोलीस ठाण्याअंतर्गत हा दरोडा झाला होता. त्यातील सोने या व्यापाºयांनी खरेदी केल्याचे पकडलेल्या आरोपींनी सांगितले व दुकाने दाखविल्याने व्यापाºयांना ताब्यात घेतल्याचे तेलंगणा पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, व्यापारी, गंगाखेड पोलीस आणि तेलंगणा पोलीस यांच्यात रात्री उशिरापर्यंत चोरीला गेलेले सोने हस्तगस्त करण्याची प्रक्रिया सुरु होती. बंद खोलीत चर्चा झाल्याने नेमके किती सोने चोरट्यांनी या व्यापाºयांना विकले व पोलिसांनी किती सोने हस्तगत केले, याची माहिती मिळू शकली नाही.

Web Title: The Telangana police picked up two bullion trades from Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.