महाबळेश्वरला तोडीसतोड परभणीचे तापमान; पारा ७.५ अंशांवर घसरल्याने जिल्हा गारठला
By मारोती जुंबडे | Published: January 25, 2024 01:08 PM2024-01-25T13:08:08+5:302024-01-25T13:09:23+5:30
शेकोट्या पेटल्या, जिल्ह्यात हुडहुडी कायम; दोन दिवसात ९ अंशांनी घसरला पारा
परभणी : जिल्ह्यात थंडीची लाट कायम असून पाऱ्याची घसरण सुरूच असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी जिल्ह्यातील पारा १६.५ अंशांवर होता. मात्र बुधवारी त्यात आणखी घसरण होऊन पारा १०.९ अंशांवर आला. गुरुवारी पारा ३ अंशांनी घसरून ७.५ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे वाढत्या थंडीने गारठल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे आता महाबळेश्वर पेक्षा परभणीचे तापमान गुरुवारी गारठले आहे.
गेल्या चार दिवसांपासून शहर परिसरात धूक्याची चादर दररोज सकाळी पसरत आहे. त्यामुळे जनजीवनावर सुद्धा परिणाम झाला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये तापमानात सातत्याने घट होत आहे. मंगळवारी जिल्ह्यातील पारा १६.५ अंशांवर होता. मात्र बुधवारी त्यात आणखी घसरण होऊन पारा १०.९ अंशांवर आला. गुरुवारी पारा ३ अंशांनी घसरून ७.५ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे परभणीकरांना बोचऱ्या थंडीचा अनुभव मिळत आहे. त्यातच गुरुवारी तर एकाच दिवसात तापमानात ३ अंशांनी घट होऊन ७.५ अंशांवर पोहचले आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात हुडहुडी कायम आहे.
आठवडाभरात १० अंशांची झाली घट
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात चांगलीच वाढ झाली होती. त्यामुळे रब्बीतील पिकांना मोठा फटका बसला. मात्र मंगळवारी जिल्ह्यातील पारा १६.५ अंशांवर होते. ते थेट गुरुवारी पारा ९ अंशांनी घसरून ७.५ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.
मागील पाच दिवसातील तापमानातील चढउतार
रविवार.....१६.६
सोमवार १२.६,
मंगळवार १६.५
बुधवार १०.९
गुरुवार ७.५
शेकोट्या पेटल्या
जिल्ह्यात अचानक थंडीचा जोर वाढल्याने रात्रीच काय तर दिवसाही नागरिक शेकोट्या पेटून लागले आहेत. थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पेटून नागरिकांचा घोळका तेथे जमा झाल्याचे दिसत आहे. थंडीच्या लाटेमुळे नागरिकांची दिनचर्या बदलून गेल्याचे जिल्ह्यात दिसत आहे.