टेम्पोच्या धडकेत सायकलस्वार बालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 01:23 PM2019-04-06T13:23:48+5:302019-04-06T13:24:47+5:30

बालकाच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला

Tempo crushed boy at Gangakhed | टेम्पोच्या धडकेत सायकलस्वार बालक जागीच ठार

टेम्पोच्या धडकेत सायकलस्वार बालक जागीच ठार

Next

गंगाखेड (परभणी ) : सुटीच्या दिवशी सायकल खेळण्याचा आनंद घेणाऱ्या एका नऊ वर्षीय बालकाचा टेम्पोच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना  दत्त मंदिर परिसरात ईसाद रोडवर घडली. आज सकाळी (दि. ६) सात वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेतील मृत बालकाचे नाव श्रुतुराज विष्णू जाधव असे आहे. 

विठ्ठल नगर येथे राहणारा श्रुतुराज विष्णु जाधव हा आपल्या आई व बहिणीसह राहत असे. आज सुटी असल्याने तो सकाळीच घरासमोर सायकल खेळत होता. काही वेळ घरासमोर सायकल खेळत असताना तो दत्त मंदिर परिसरातील इसाद रोडवर आला. याच दरम्यान कापूस घेऊन जाणाऱ्या भरधाव वेगातील एका आयशर टेम्पोने श्रुतुराजला धडक दिली. या जोरदार धडकेत श्रुतुराज खाली पडला आणि त्याच्या डोक्यावरून टेम्पोचे टायर गेले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सपोनि सुरेशराव थोरात, सपोनि राजेश राठोड, जमादार वसंत निळे, बळीराम करवर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिड वर्षात जाधव कुटुंबावर दुसरा आघात
श्रुतुराज याच्या वडिलांनी सुमारे दिड वर्षापूर्वी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली होती. तेंव्हापासून श्रुतुराज त्याच्या आई व लहान बहिणीसोबत विठ्ठल नगर येथे राहत होते. गुढी पाडव्याच्या दिवशीच या बालकाचा अपघाती मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दिड वर्षात हा दुसरा आघात झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Web Title: Tempo crushed boy at Gangakhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.