अस्थायी अतिक्रमणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:17 AM2021-04-10T04:17:00+5:302021-04-10T04:17:00+5:30
वाहनतळाचा अभाव परभणी : बाजारपेठ भागात महापालिकेने निश्चित केलेल्या वाहनतळाच्या जागेवर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे वाहने उभी करण्यास जागा ...
वाहनतळाचा अभाव
परभणी : बाजारपेठ भागात महापालिकेने निश्चित केलेल्या वाहनतळाच्या जागेवर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे वाहने उभी करण्यास जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे बाजारपेठेत दररोज वाहतूक समस्या निर्माण होत आहे.
रस्त्याची कामे ठप्प
परभणी : शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना महापालिकेने फाटा दिला आहे. मागील दोन वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.मात्र निधीची अडचण पुढे करीत दुरुस्तीची कामे केली जात नाहीत.
चौकाची दुरवस्था
परभणी : येथील गव्हाणे चौक परिसरात काही वर्षांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र देखभाल अभावी या चौकाची दुरवस्था झाली आहे. लाखो रुपये खर्चून लावलेले कारंजे बंद असून, चौक परिसरात धूळ वाढली आहे.
रस्ता बनला उजाड
परभणी : गंगाखेड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी या भागातील झाडे तोडण्यात आली आहेत. मात्र कंत्राटदाराने या रस्त्याच्या कडेला नवीन झाडे लावली नाहीत. त्यामुळे रस्ता उजाड झाला आहे.