स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लुटण्याचे प्रकार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:52 AM2021-01-08T04:52:36+5:302021-01-08T04:52:36+5:30
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्याच्या बाहेरील व्यक्तीशी संपर्क करून त्यांना विश्वासात घेऊन लूट केल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. ...
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्याच्या बाहेरील व्यक्तीशी संपर्क करून त्यांना विश्वासात घेऊन लूट केल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. यापूर्वी २३ ऑगस्ट २०२० रोजी हिंगोली येथील आकाश कुरील या व्यक्ती सोबत ओळख करून त्यांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तालुक्यातील शिरसी येथे बोलावून घेऊन त्याच्याकडील ३ लाख रुपये लुटल्याची घटना घडली होती. त्यानंतर माहूर तालुक्यातील बोरड येथील सागर राठोड या युवकाशी ओळख निर्माण करून त्यालाही स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून गंगाखेड येथे बोलावले होते. गंगाखेड तालुक्यातील गोविंदवाडी येथे त्यांना नेऊन त्यांच्याकडील ६ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्याची घटना ३ जानेवारी रोजी घडली होती. या दोन्ही घटनेत सापडलेले सोने विकण्याचे आमिष आरोपींनी दाखवले होते. फिर्यादीने दिलेल्या माहितीवरुन आरोपींना सोनपेठ पोलिसांनी पोलीसी कसब वापरत चोवीस तासाच्या आत अटक केली.