‘येलदरी’चे दहा दरवाजे पुन्हा उघडले; मुसळधार पावसाने आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 02:25 PM2021-10-06T14:25:03+5:302021-10-06T14:31:24+5:30

Yeldari Dam येलदरी धरण १०० टक्के भरल्याने प्रशासनाला पूर नियंत्रण करताना कसरत करावी लागत आहे.  

The ten doors of ‘Yeldari’ reopened; Heavy rains increased arrivals | ‘येलदरी’चे दहा दरवाजे पुन्हा उघडले; मुसळधार पावसाने आवक वाढली

‘येलदरी’चे दहा दरवाजे पुन्हा उघडले; मुसळधार पावसाने आवक वाढली

Next
ठळक मुद्देपूर्णा प्रकल्पात पावसाची वार्षिक सरासरी ६५० ते ७५० मि.मी. एवढी आहे.यावर्षी धरण परिसरात १२०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस

येलदरी (ता.जिंतूर) : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाच्या ( Yeladari Dam ) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस ( Heavy Rain In Parabhani ) झाल्याने पूर्णा नदीला ( Purna River ) पूर आला असून, प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास येलदरी धरणाचे सर्व म्हणजे १० दरवाजे उघडून २१ हजार १०० क्यूसेस पाणी पूर्णा नदीपात्रात सोडले जात आहे.

येलदरी धरण १०० टक्के भरल्याने प्रशासनाला पूर नियंत्रण करताना कसरत करावी लागत आहे.  मागील आठ दिवसांपासून धरणाचे दरवाजे कमी अधिक प्रमाणात सुरू करावे लागले. येलदरीतून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे धरणाखालील पूर्णा नदी दुथडी भरुन वाहत आहेत.
पूर्णा प्रकल्पावर उभारलेले बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा, जिंतूर तालुक्यातील येलदरी व हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण ही तिन्ही धरणे तुडुंब भरलेले असल्याने अतिरीक्त पाणी या तिन्ही धरणांमधून सोडावे लागत आहे.

कोरोना वाढल्याने मानवतमध्ये गर्दीच्या ठिकाणांवर दहा दिवस निर्बंध

पूर्णा प्रकल्पात पडणाऱ्या पावसाची वार्षिक सरासरी ६५० ते ७५० मि.मी. एवढी आहे. मात्र यावर्षी धरण परिसरात १२०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. परिसरात पावसाची गंभीर स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन ,कापूस ,तूर, उडीद, मूग ही पिके उद्‌ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

वाण नदीत मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

Web Title: The ten doors of ‘Yeldari’ reopened; Heavy rains increased arrivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.