टेनिस बॉल स्पर्धा : परभणीत रंगणार २६ ते २८ जानेवारी दरम्यान सामने;निवड चाचणीत ५० खेळाडूंचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:02 AM2019-01-23T00:02:33+5:302019-01-23T00:02:41+5:30
परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने १९ जानेवारी रोजी नूतन विद्यालयाच्या क्रीडांगणावर जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल जिल्हा संघाच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते़ या चाचणीत जिल्ह्यातील ५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला़
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने १९ जानेवारी रोजी नूतन विद्यालयाच्या क्रीडांगणावर जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल जिल्हा संघाच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते़ या चाचणीत जिल्ह्यातील ५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला़
या निवड चाचणीचे उद्घाटन कृउबा सभापती रविंद्र डासाळकर यांच्या हस्ते झाले़ या प्रसंगी माजी आ़ हरिभाऊ लहाने, मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, अशोक गाजरे, गिरीष लोडया, तुकाराम शेळके, अविनाश शेरे, संतोष शिंदे, सचिन हिरवे, जुलाह खुद्दूस, जिजाभाऊ डख यांची उपस्थिती होती़
निवडलेला संघ विसाव्या राज्य मिनी/युथ टेनिस हॉलीबॉल स्पर्धेसाठी परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या प्रांगणात २६ ते २८ जानेवारी दरम्यान आयोजित स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व करणार आहे़ गणेश माळवे, संतोष शिंदे यांनी प्रास्ताविक केले़ प्रा़ नागेश कान्हेकर यांनी सूत्रसंचालन केले तर सतीश नावाडे यांनी आभार मानले़
४संत जनाबाई महाविद्यालय
गंगाखेड- शहरातील श्री संत जनाबाई महाविद्यालयात २६ ते ३० जानेवारी दरम्यान विविध गटात होणाऱ्या कुमार गट कुस्ती स्पर्धेसाठी १९ जानेवारी रोजी निवड चाचणी घेण्यात आली़
यामध्ये ४१ ते ९२ किलोग्रॅम वजन गटातील संघात सोपान निवृत्ती सोन्नर, गजानन तेलगड, सागर कदम, शरद सुक्रे, कृष्णा कराड आदी खेळाडूंची निवड करण्यात आली़ यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ़ दयानंद उजळंबे, क्रीडा संचालक डॉ़ चंद्रकांत सातपुते, प्रा़ डॉ़ संजिव कोळपे, प्रा़ डॉ़ सतीश डोंगे, प्रा़ निवृत्ती भेंडेकर, प्रा़ भगवान भोसले, प्रा़ डॉ़ विठ्ठल डुमनर, राष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण भोसले आदींची उपस्थिती होती़
तालुकास्तरीय स्पर्धेत जवाहर विद्यालयाचा डंका
४जिंतूर- तालुका संवर्धन मंडळाने आयोजित केलेल्या समूहगीत, समूहनृत्य व कथाकथन स्पर्धेत शहरातील जवाहर विद्यलायाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून वर्चस्व गाजविले़ या संघाच्या यशाबद्दल प्रशासकीय अधिकारी के़डी़ वटाणे, प्रा़ बळीराम वटाणे, संगीत शिक्षक डी़व्ही़ पांडे, एस़आऱ घुले, एस़एस़ इंगळे, रामकृष्ण दराडे, एम़जी़ मोरे यांनी खेळाडूंचा सत्कार केला़